शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

फटाके विक्री स्टॉलचे पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश; अवेळी फटाके वाजवल्यास होणार गुन्हे दाखल  

By धीरज परब | Updated: October 25, 2022 23:14 IST

Firecracker: मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागलेले फटाके विक्री स्टॉल उच्च न्यायालयाचे आदेश आणि शासन निर्देशा प्रमाणे आहेत कि नाही ? याची चौकशी करण्यास  संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींना सांगण्यात आले आहे .

- धीरज परबमीरारोड - मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागलेले फटाके विक्री स्टॉल उच्च न्यायालयाचे आदेश आणि शासन निर्देशा प्रमाणे आहेत कि नाही ? याची चौकशी करण्यास  संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींना सांगण्यात आले आहे . फटाके वाजवून न्यायालय आदेश व शासन अधिनियमचे उल्लंघन करून ध्वनी व वायू प्रदूषणचा लोकांना त्रास देणाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यास पोलीस ठाण्यांना सांगण्यात आले आहे . पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी गांभीर्याने दखल घेत कारवाईचे आदेश दिल्याने आता ठोस कारवाई होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे . 

कमी उत्सर्जन असलेले फटाके व केवळ हिरवे फटाके यांची निर्मिती व विक्री करण्यात यावी असं सांगण्यात आले असून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि घनकचऱ्याचा समस्या निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या निर्मिती व विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फटाक्यांमध्ये बेरियम क्षारांचा वापर करण्यास बंदी आहे. फटाक्यांच्या वापरामुळे होणारे हानिकारक परिणाम याची माहिती सर्वसामान्य जनतेस सहज उपलब्ध आहे . 

फटाक्यांची निर्मिती, वाहतूक, विक्री व वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची बंदी असून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. फटाके वाजविण्याकरता वेळ देखील निश्चित करण्यात आलेली आहे. सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी आपापल्या हद्दीमध्ये फटाके विक्री करणाऱ्या स्टॉल धारकांकडून न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांची फटाके विक्रेते पूर्तता करत आहेत किंवा नाही याची व्यक्तिशः दखल घेऊन कार्यवाही करावी. फटाके निश्चित दिलेल्या वेळेतच वाजवले जातील याची खबरदारी घ्यावी. अवेळी फटाके फोडणाऱ्यांवर  गुन्हा दाखल करावा असे निर्देश पोलीस ठाणे प्रभारींना दिल्याची माहिती पोलीस आयुक्तालयातून मिळाली आहे.

मीरा भाईंदर व वसई विरार शहरात रात्री उशीरा पर्यंत मोठ्या प्रमाणत वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके वाजवण्यात येत असल्याने कारवाईची मागणी होत आहे . तर शहरात बेकायदा फटाके विक्री स्टॉल मोठ्या प्रमाणात लागलेले असून या मुळे भीषण दुर्घटना घडण्याची भीती असल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अश्या तक्रारी आहेत . त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिलेल्या आदेशा मुळे ठोस कारवाई होईल अशी आशा नागरिकां कडून व्यक्त होत आहे.

लोकमत ऑनलाईन ने शहरातील बेकायदा फटाका विक्री स्टॉल व मनमानीपणे वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यां मुळे लोकांना होणारा त्रास तसेच वायू आणि ध्वनी प्रदूषण वाढल्याचे वृत्त दिले होते . त्याची दखल घेत आता कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :fire crackerफटाकेMira Bhayanderमीरा-भाईंदर