शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी ठाण्यात पितापुत्राने डोके आपटून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:58 IST

कारवाई टाळण्यासाठी विना हेल्मेटने आलेल्या दुचाकीवरील पितापुत्राने स्वत:चेच डोके आपटून घेत तीन हात नाक्यावरील वाहतूक चौकीत गोंधळ घातला. पोलिसांनाच गोळया घालण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देगोळ्या घालण्याचीही दिली धमकीट्रॅफिक वार्डनला केली धक्काबुक्कीवाहतूक चौकीतच घातला गोंधळ

ठाणे :  विना हेल्मेटने तुटलेल्या नंबरप्लेटच्या दुचाकीवरून जाणा-या दोघांना वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तीन हातनाक्यावर अडवले. त्यानंतर, होणारी कारवाई टाळण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डनला धक्काबुक्की करत पितापुत्राने डोके आपटून घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पितापुत्रासह तिघांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास तीनहातनाका येथे वाहतूक शाखेचे हवालदार कुंडलिक काकडे, अप्पासाहेब तमखाणे, पालांडे आणि वॉर्डन नितीन पारकर हे कार्यरत होते. त्याचवेळी नाजीर अहमद शेख (२५, रा. मुंबई) आणि त्याचे वडील अहमद हे दोघे एका दुचाकीवरून मल्हार सिनेमागृहाकडून तीनहातनाक्याकडे आले. नाजीर विनाहेल्मेट होता. शिवाय, दुचाकीची नंबरप्लेटही तुटलेली असल्याने तमखाणे यांनी त्यांना कागदपत्रांची विचारणा केली. त्यांच्याकडे कागदपत्रेही नव्हती. त्यामुळे हेल्मेट नसणे, नंबरप्लेट तुटलेली लावणे आणि कागदपत्रे नसणे, या तीन कलमांची पावती त्यांना देण्यात आली. तेव्हा संतापलेल्या नाजीरने त्यांच्याशी हुज्जत घातली. सौजन्याने बोलण्याची समज वॉर्डन पारकर यांनी दिल्यावरही नाजीरने मात्र ‘गोळ्या घालून मारून टाकीन, एकेकाला उडवून देईल’, अशा धमक्या दिल्या. तिथे आलेले वाहतूक सेनेचे तथाकथित अध्यक्ष पिरजादे यांनीही या दोघांना ‘डोके आपटून घ्या, मग पोलिसांकडे बघतो’ असे सांगितले. त्यानंतर, नाजीर आणि त्याच्या वडिलांनी डोके आपटून घेत वाहतूक शाखेच्या चौकीतच धुमाकूळ घातला. दरम्यान, नाजीरला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नाजीरसह तिघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाtraffic policeवाहतूक पोलीस