शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकन्यायालयात अपघातग्रस्ताला ९५ लाखांची भरपाई देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 21:37 IST

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुशार ठाणे जिल्हा न्यायालयात रविवारी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले होते. यामध्ये २०१३ मधील एका अपघात प्रकरणात ९५ लाखांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ठाणे न्यायालयात रविवारी पार पडलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे तसेच न्यायाधीश एन. के. ब्रम्हे, आर. एन. रोकडे यांनीही पक्षकारांशी संवाद साधल्यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्दे मोटार अपघात नुकसान भरपाईची २१८ प्रकरणे निकालात न्यायाधीशांनी साधला पक्षकारांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुशार ठाणे जिल्हा न्यायालयात रविवारी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले होते. यामध्ये २०१३ मधील एका अपघात प्रकरणात ९५ लाखांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. लोक न्यायालयातील मोटार अपघात नुकसान भरपाईची २१८ प्रकरणे यावेळी निकाली काढण्यात आली.या लोक न्यायालयात ठाणे मुख्यालयात २१८ मोटार अपघात प्रकरणांपोटी सुमारे १२ कोटी ४० लाख ९३ हजारांची नुकसान भरपाई मोटार अपघातातील जखमींना तसेच मृतांच्या कायदेशीर वारसांना मंजूर झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लोकन्यायालयात दाखल झालेल्या २१८ पैकी १७४ प्रकरणांमध्ये आॅनलाईन पध्दतीने तडजोड केल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. देशपांडे यांनी दिली. या प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांशी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यात त्यांनी या तडजोडीला मान्यता दिली.* या प्रकरणात मिळाली ९५ लाखांची भरपाई-स्वप्नील डोके हे १ जुलै २०१३ रोजी ठाण्यातील घोडबंदर रोडवरून मोटारसायकलने जात होते. त्याचवेळी त्यांना एका ट्रकची मागून धडक बसली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. स्वप्नील यांच्या पत्नी, मुलगी तसेच आई - वडिलांनी २०१३ मध्येच नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात न्याय प्राधिकरणाकडे अर्ज दाखल केला होता. सर्व बाजू पडताळून न्यायालयाने त्यांना ९५ लाखांची भरपाई देण्याचे आदेश दिले.* ठाणे न्यायालयात रविवारी पार पडलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे तसेच न्यायाधीश एन. के. ब्रम्हे, आर. एन. रोकडे यांनीही पक्षकारांशी संवाद साधल्यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयAccidentअपघात