शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात ठार झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांना ५६ लाखांची भरपाई देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 21:52 IST

ट्रेलरचे मालक आणि रिलायन्स वीमा कंपनीने ही भरपाई सात टक्के व्याजाच्या दराने संबंधित पोलीस हवालदाराच्या नातेवाईकांना देण्याचे आदेश न्यायाधिकरणाचे सदस्य आर. एन. रोकडे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे ठाणे मोटार वाहन अपघात न्यायाधिकरणाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई नाशिक राष्टÑीय महामार्गावर बेफिकिरीने उभ्या असलेल्या एका ट्रेलरच्या धडकेत पोलीस वाहनामधील ४७ वर्षीय पोलीस हवालदाराचा चार वर्षापूर्वी मृत्यु झाला होता. याच प्रकरणामध्ये अपघातामध्ये मृत पावलेल्या पोलीस कुटूंबीयांच्या नातेवाईकांना ५६ लाखांची भरपाई देण्याचे आदेश ठाणे मोटार वाहन अपघात न्यायाधिकरणाने गुरुवारी दिले आहेत.ट्रेलरचे मालक आणि रिलायन्स वीमा कंपनीला ही भरपाई सात टक्के व्याजाच्या दराने संबंधित पोलीस हवालदाराच्या नातेवाईकांना देण्याचे आदेश न्यायाधिकरणाचे सदस्य आर. एन. रोकडे यांनी दिले आहेत. ठाणे ग्रामीणचे ४७ वर्षीय पोलीस हवालदार प्रमोद निवतकर (नेमणूक, वासिंद पोलीस स्टेशन) हे २८ डिसेंबर २०१६ रोजी मुंबई - नाशिक महामार्गावरुन त्यांच्या पोलीस जीपने प्रवास करीत होते. त्यावेळी कोणताही दिवा न लावताच रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रेलरला या जीपची धडक बसली होती. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रमोद यांचा उपचारादरम्यान त्याच दिवशी मृत्यु झाला होता. ट्रेलर चालकाने कोणताही सिग्नल न देता, बेफिकिरीने रस्त्यातच हा ट्रेलर उभा केल्यामुळेच हा गंभीर अपघात झाल्याचे न्यायाधिकरणाचे वकील एच. पी. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. कुटूंबातील एकमेव कमवते असलेल्या प्रमोद यांना ४६ हजार ६८२ इतके वेतन होते. वीमा कंपनीने प्रकरण दाखल करुनही ट्रेलर मालक हजर झाला नव्हता. त्यामुळे हे प्रकरण निश्चित झाले. परावर्तकांशिवाय रस्त्यावर वाहन उभे करणे हे अत्यंत धोक्याचे आहे, हा ट्रेलर चालकाचा अक्षम्य गुन्हा असल्याचे निरीक्षणही न्यायाधीकरणाने नोंदविले. त्याच पार्श्वभूमीवर प्रमोद यांच्या दोन्ही मुलांच्या नावाने प्रत्येकी १५ लाख रुपये राष्टÑीयकृत बँकेत गुंतविण्यात यावेत. तसेच दहा लाख रुपये त्याच्या पत्नीच्या नावाने आणि पाच लाख रुपये त्याच्या वयस्कर आईला तर उर्वरित ११ लाखांची रक्कम पत्नीला धनादेशाने देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने बुधवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयAccidentअपघात