शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

मुंब्रा बायपास दुरुस्तीसाठी पर्यायी रस्त्यांच्या पाहणीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 3:14 AM

मुंब्रा बायपास रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

ठाणे : मुंब्रा बायपासवरील वाहनांना पर्यायीमार्गे सोडण्यापूर्वी प्रथम त्या रस्त्यांची दुरुस्ती व आवश्यक सुविधा पुरवण्याचे आदेश ठाण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नरनावरे यांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक व पोलीस यंत्रणेला दिले. पर्यायी रस्त्यांची पाहणी करून सुधारणा करण्यासंबंधीचा अहवाल तातडीने देण्याचे फर्मान त्यांनी बांधकाम विभागास सोडले.जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरले. मुंब्रा बायपास रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक मंगळवारीच अन्यमार्गे वळवण्याचे वाहतूक विभागाने घोषित केले होते. मात्र, पर्यायी मार्गांची अवस्था दयनीय असल्यामुळे संभाव्य अपघात होण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे व पालघर पोलीस अधीक्षकांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले आणि जिल्हाधिकाºयांकडून हव्या असलेल्या अधिसूचनेला विलंब झाला.ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातून जाणाºया वाहनांसाठी पर्यायी रस्ते दुरुस्त करणे, वाहतूक नियंत्रक स्वयंसेवकाची गरज, ठिकठिकाणचे विद्युतीकरण या मुद्यांकडे जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले. यामुळे होत असलेल्या विलंबासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संभाजी पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, बांधकाम विभागास तातडीने पर्यायी रस्त्यांच्या दुरुस्ती व आवश्यक सोयीसुविधांची पाहणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षकांच्या रास्त मुद्यांना विचारात घेऊन अधिसूचना काढली जाईल.

टॅग्स :mumbraमुंब्रा