शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा विरोध मावळला; कचऱ्याचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:22 IST

बायोगॅस प्रकल्प राबविण्याचे आश्वासन

बदलापूर : कुळगाव-बदलापूर पालिकेच्या घंटागाडी कचरा टाकण्यासाठी साई वालवली गावाजवळील डम्पिंग ग्राऊंडवर जात होत्या. मात्र या ठिकाणी असलेल्या डम्पिंगचा त्रास होत असल्याचे कारण देत नवीन वडवली आणि नवीन अंबरनाथ गावातील ग्रामस्थांनी बदलापूर पालिकेच्या घंटागाड्या अडवत कचरा टाकण्यास बंदी घातली. या प्रकरणी अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात वादावादीही झाली. मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी आणि माजी नगराध्यक्ष यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच त्यांची समजूत घालून कचरा टाकण्यासाठी केलेला विरोध क्षमविण्यात यश मिळविले.नवीन अंबरनाथ गावाला लागूनच बदलापूर पालिकेचे डम्पिंग ग्राऊंड आहे. या डम्पिंगचा धूर आणि दुर्गंधीचा त्रास होत असल्याने साई ग्रामपंचायत हद्दीतील नवीन अंबरनाथ गावातील ग्रामस्थांनी घंटागाडी रोखत आंदोलन केले होते. एकही घंटागाडी डम्पिंगवर जाऊ देणार नाही अशी ठाम भूमिका या ग्रामस्थांनी घेतली होती. त्यामुळे बदलापूरमध्ये कचरा कोंडी निर्माण झाली होती. या कचराकोंडीमुळे बदलापूर पालिका प्रशासन या ग्रामस्थांबरोबर चर्चा करण्यात व्यस्त होते. सोमवारी झालेली चर्चा अपयशी ठरल्यावर पुन्हा मंगळवारी स्वता मुख्याधिकारी प्रकाश बोरसे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी स्थानिक ग्रामस्थांसोबत चर्चा केली.डम्पिंगच्या होणाºया त्रासाची माहिती ग्रामस्थांनी अधिकाºयांना दिली. यावर पालिकेच्या मुख्याधिकाºयांनी डम्पिंगवरील कचरा कमी करण्यासाठी शहरात विविध प्रकल्प राबवित असल्याची माहिती दिली. शहरात अनेक ठिकाणी सोसायटीमध्येच कचºयावर प्रक्रिया केली जात आहे. तर उर्वरित कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका प्रशासन बागोगॅस प्रकल्प राबविणार असल्याचे स्पष्ट केले. हा प्रकल्प सुरू झाल्यावर ओल्या कचºयावर प्रक्रिया करून तो कचरा तिथेच नष्ट केला जात असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. हा कचरा नष्ट झाल्यावर डम्पिंगवर त्याचा कोणताही ताण पडणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र तरीही ग्रामस्थ पालिकेच्या या निर्णयावर समाधानी नव्हते.बोरसे यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष म्हात्रे यांनीही कचºयावरील प्रक्रिया केंद्राची माहिती ग्रामस्थांना दिली. तसेच भविष्यात त्याचा कोणताही त्रास होणार नसल्याची ग्वाही देण्यात आली. सोबत गावातील ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. गावातील विकासकामांबाबतही पालिका प्रशासन सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या सर्व प्रक्रियेसाठी महिन्याभराची मुदतही ग्रामस्थांनी दिली आहे. महिन्याभरात समाधानकारक कामे न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.पालिका प्रशासनाची कसोटीडम्पिंगच्या त्रासाच्या विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले असताना या गावातील मुख्य नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला काय करता येईल याचा विचार आता सुरु झाला आहे. ग्रामस्थांना पालिकेच्या प्रकल्पाची कल्पना दिल्याने त्यांचा राग शांत झालेला असला तरी त्यांना देण्यात आलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास त्याचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने आता डम्पिंग आणि कचरा प्रक्रिया केंद्राच्या बाबतीत आपली तत्परता दाखविण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नbadlapurबदलापूर