शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

ठाणे अर्थसंकल्पाला विरोधकांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:55 AM

ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी १९ मार्च रोजी अंदाजपत्रक मांडले. ते सादर केल्यानंतर त्यावर चर्चा न करताच राष्ट्रगीत सुरू झाले. याचा अर्थ ते विनाचर्चा मंजूर झाले, असा होत असूनही सत्ताधाऱ्यांकडून नव्याने महासभा बोलावण्याची तयारी सुुरू केली आहे.

ठाणे : ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी १९ मार्च रोजी अंदाजपत्रक मांडले. ते सादर केल्यानंतर त्यावर चर्चा न करताच राष्ट्रगीत सुरू झाले. याचा अर्थ ते विनाचर्चा मंजूर झाले, असा होत असूनही सत्ताधाऱ्यांकडून नव्याने महासभा बोलावण्याची तयारी सुुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही आघाडीचे घटक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ३८ नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अंदाजपत्रकाला पाठिंबा जाहीर केला.या वेळी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे गटनेते विक्र ांत चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, मुकुंद केणी यांच्यासह विरोधी पक्षांचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.मिलिंद पाटील यांनी सांगितले की, १९ मार्चच्या महासभेमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. त्या सभेमध्ये आयुक्तांच्या विश्लेषणानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यामुळे ही सभा संपल्याचे स्पष्ट झाले आहे. ती सभा तहकूब किंवा खंडित केलेली नाही. त्यामुळे नव्याने सभा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही बाब नजीब मुल्ला यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली आहे. शहर विकासासाठी हा चांगला अर्थसंकल्प असल्याने त्यास आमचा पाठिंबा असून नगरसेवकांच्या प्रभागातील नागरी कामांसाठी आयुक्तांनी निधी द्यावा, अशी आमची मागणी आहे. आयुक्तांनी त्याला सकारात्मकता दर्शवल्याचे ते म्हणाले.दरम्यान, हा अर्थसंकल्प नियमानुसार मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता सत्ताधाºयांनी जरी नव्याने महासभा बोलावण्याचा प्रयत्न केला तर, ती सभा आधी कायदेशीर आहे की बेकायदेशीर, हे आम्ही पडताळून पाहणार असून ती बेकायदेशीर असल्यास अनुपस्थित राहू, असेही पाटील यांनी सांगितले. बुधवारच्या महासभेत अधिकारी वर्ग अनुपस्थित राहणे हा सत्ताधाºयांचा पराभव असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.ठाणे महापालिकेकडून ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ठाणेकरांच्या हितासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारादेखील यावेळी लोकशाही आघाडीने दिला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका