शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बिहार दिनाच्या कार्यक्रमास मराठी एकीकरण समितीचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 09:47 IST

मराठी एकीकरण समितीने मात्र सदर कार्यक्रमास विरोध करून कोणत्याही परवानग्या देऊ नका, अशी मागणी केली आहे.

मीरा रोड - मीरा रोडच्या श्रीकांत जिचकर चौकजवळील मैदानात २१ व २२ मार्च रोजी बिहार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मराठी एकीकरण समितीने मात्र सदर कार्यक्रमास विरोध करून कोणत्याही परवानग्या देऊ नका, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मीरा रोड पोलीस आदींना समितीच्या वतीने अध्यक्ष गोवर्धन देशमुख, कार्याध्यक्ष प्रदीप सामंत, मीरा भाईंदर अध्यक्ष सचिन घरत यांनी निवेदन दिले आहे.या बिहार दिनाच्या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार, अशी जाहिरातबाजी सुरू आहे. बिहार राज्य दिवस साजरा करण्याशी महाराष्ट्र राज्याचा काही संबंध नाही. अशा कार्यक्रमातून भडकावणारी व तेढ निर्माण करणारी भाषणे केली जातात. अश्लील व अपु-या कपड्यांमध्ये नाचगाणी होतात. धागडधिंगा घातला जातो. जेणेकरून राज्याच्या संस्कृती व युवा पिढीवर वाईट परिणाम होतो. वाहतुकीची कोंडी होते. डिजे वापरला जातो तसेच ध्वनिप्रदूषण केले जाते. पोलिसांवर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण पडतो.त्यातच सध्या कोरोना संसर्गामुळे शहरातील सभागृह, व्यायामशाळा आदी बंद केली असून, या बिहार दिनाच्या कार्याक्रमास सुद्धा कोणतीच परवानगी देऊ नये, अशी मागणी समितीने केली आहे. राज्यात मराठी भाषा दिवस वा महाराष्ट्र दिन असतो. त्यावेळी मात्र ही मंडळी कार्यक्रम करत नाहीत. कारण त्यांना मराठी व महाराष्ट्राशी काही सोयरसुतक नसून केवळ बक्कळ पैसा कमावून आपली संपत्ती वाढवायची आणि राजकीय ताकद अशा कार्यक्रमातून दाखवायची असल्याने अशा कार्यक्रमांचा समिती विरोध करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :mira roadमीरा रोड