शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

नाल्यात उतरून विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी उघड केली नालेसफाईची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 4:29 PM

नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी शुक्रवारी पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी नाल्यात उतरुन क्रिकेट खेळून नालेसफाईच्या कामाची पोलखोल केली.

ठळक मुद्दे५५ टक्के नालेसफाई झाल्याचा दावानालेसफाईच्या कामात गुंतले अर्थकारण

ठाणे - मान्सूनच्या आगमनाला काही दिवस शिल्लक असतांनाच अद्यापही ठाण्यात नालेसफाईच्या कामाला वेग आला नसल्याची बाब समोर आली आहे. नालेसफाईचा ठाणे महापालिकेकडून केला जाणारा दावा हा किती फोल आहे, हे शुक्रवारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी नळपाड्यातील नाल्यात उतरुन क्रिकेट खेळून दाखवून दिले.         ठाणे महापालिका हद्दीत ११९ किमीचे ३०६ नाले आहेत. त्यामध्ये १३ मोठे नाले आहेत. या सर्व नाल्यांची दरवर्षी पावसाळ्यापुर्वी साफसफाई करण्यात येते. नाल्यातील कचऱ्यामुळे पावसाचे पाणी तुंबून आपतकालीन परिस्थिती निर्माण होऊ नये या उद्देशातून ही कामे करण्यात येतात. यंदाही शहरात अशाचप्रकारे नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली असून या कामांचा शुक्र वारी सकाळी विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील यांनी दौरा केला. या दौयादरम्यान, जिल्ह््याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या किसननगर, साठेनगर, इंदीरानगर या भागांसह नळपाडा, राबोडी भागातील नाले अजूनही कचºयाने तुंबलेले असल्याचे चित्र दिसून आले आहे. येथील नागरीकांच्या म्हणन्यानुसार केवळ वरवर नालेसफाई केली जात असल्याने गाळ आहे, तसाच नाल्यात साचल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी साठेनगर भागातील नाला तुंबून त्याचे पाणी आसपासच्या घरांमध्ये शिरते. असे असतानाही हा नाला आजही कचºयाने भरलेला आहे. या नाल्याची साफसफाई करताना अर्धा कचरा उचलण्यात आला असून अर्धा कचरा अजूनही उचलण्यात आलेला नाही. या नाल्यात प्लॉस्टीक बाटल्या, चपला, जुन्या वस्तु असा कचरा साचलेला असून त्यावर डुक्कर आणि कोंबड्यांचा मुक्त संचार सुरु होता. किसननगर भागातही नाल्यांची सफाई करण्यात आल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले. मात्र, सफाईनंतही या नाल्यांमध्ये कचयाचे ढिग पडल्याचे दिसून आले. इंदीरानगर आणि नळपाडा या दोन नाल्यांमधील कचरा आणि मातीचा गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या नाल्यातील मातीच्या गाळावर विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकूंद केणी, सुहास देसाई यांच्यासह इतरांनी क्रि केट खेळून सत्ताधारी आणि प्रशासनाच्या कारभाराचा वेगळ्या अनोख्या पध्दतीने निषेध केला. नालेसफाई कामांची मुदत संपायला अवघे आठ दिवस शिल्लक राहीलेले असतानाच प्रशासनाकडून ५५ टक्के नालेसफाईचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र नाल्याची परिस्थिती पहाता हा दावा पोकळ ठरल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यंदा पावसाळा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तिवला गेला असतांना सुध्दा ठाण्यात नाल्यांची ही अवस्था असल्याने याला सर्वस्वी प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच नालेसफाईच्या कामांसाठी ठेकेदार नेमून या कामांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतात. त्यानंतरही दरवर्षी नाले तुंबत असल्याने त्यामध्ये अर्थकारण होत असल्याचा गौप्यस्फोटही यावेळी पाटील यांनी केला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसtmcठाणे महापालिका