शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरजी भूखंडातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला धार्मिक वळण देत विरोध; पोलिसांना धक्काबुक्की

By धीरज परब | Updated: December 20, 2024 22:40 IST

Mira Road News: मीरारोडच्या शांती पार्क , गोकुळ व्हिलेज मधील रहिवाश्यांच्या हक्काच्या आरजी जागेत कम्युनिटी हॉलच्या आड झालेल्या धार्मिक स्थळां मधील बेकायदा बांधकामाचा भाग तोडण्याच्या कारवाई दरम्यान त्याला धार्मिक वळण देत जमावाने सरकारी कामात अडथळा आणला.

मीरारोड - मीरारोडच्या शांती पार्क , गोकुळ व्हिलेज मधील रहिवाश्यांच्या हक्काच्या आरजी जागेत कम्युनिटी हॉलच्या आड झालेल्या धार्मिक स्थळां मधील बेकायदा बांधकामाचा भाग तोडण्याच्या कारवाई दरम्यान त्याला धार्मिक वळण देत जमावाने सरकारी कामात अडथळा आणला . तसेच पोलिसांना धक्काबुक्की करत महिला  वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना काठीने मारहाण केली . या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोकुळ व्हिलेज मध्ये मोठा आरजी भूखंड हा रहिवाश्यांचा हक्काचा असताना त्यात विविध अतिक्रमण आणि बांधकामे झाली आहेत . तर आरजी जागेत कम्युनिटी हॉल बांधता येत असला तरी ये ठिकाणी दोन संस्थांनी बांधकामे करून त्याचा हॉल भाड्याने देणे तसेच धार्मिक स्थळ म्हणून वापर चालवला आहे . रहिवाश्यांच्या हक्काचा आरजी भूखंड असताना त्यांनाच येथे येण्यास बंदी होती . त्यामुळे मुलांना खेळण्यास जागा नाही व रहिवाश्याना विरंगुळा , व्यायाम आदी पासून मुकावे लागले.

गोकुळ शांती वेल्फेअर असोसिएशन ह्या रहिवाश्यांच्या संघटनेने या प्रकरणी महापालिके पासून शासना कडे सातत्याने तक्रारी करत आरजीचा भूखंड मोकळा करून द्यावा . अतिक्रमण हटवावे अशी मागणी चालवली होती . पालिकेने देखील पूर्वीच येथील बरेच बांधकाम वाढीव आणि अनधिकृत ठरवून देखील त्यावर कारवाई मात्र केली जात नव्हती . काही राजकीय मंडळी देखील कारवाई होऊ नये म्हणून दबाव टाकत होते.

मुंबई उच्च न्यायालयाने देखील रहिवाश्यांच्या याचिकेवर पालिकेला फटकारत कारवाईचे आदेश दिले होते . त्या नंतर विकासक व बेकायदा बांधकाम करणाऱ्या संस्था यांनी स्वतःहून वाढीव बांधकाम तोडणे सुरु केले होते . परंतु थोडेफार तोडून बाकी तोडण्यास टाळाटाळ सुरु झाली.

अखेर महापालिकेने शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बेकायदा बांधकाम तोडण्यास घेतले . कारवाईच्या वेळी काही संघटना व पक्षाच्या लोकांनी विरोध दर्शवत घोषणाबाजी केली . कारवाईचा जेसीबी अडवण्यात आल्याने पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांशी धक्काबुक्की सुरु केली . त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली गेली.

पोलिसांनी जमावाला पिटाळून लावत काहींना ताब्यात घेतले . मीरारोड पोलीस ठाण्यात काही संघटनांच्या कार्यकर्त्यांसह ९ ते १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान पालिकेने एका हॉल - धार्मिक स्थळातील २ खोल्या , २ बाथरूम व १ जिना तोडला . तर दुसऱ्या हॉल - धार्मिक स्थळ येथील २ बाथरूम , १ खोली व १ जिना बेकायदा असल्याने पाडण्यात आला . तर काही अनधिकृत बांधकाम संबंधित विकासक व संस्था यांना काढून घेण्याचे पालिकेने सांगितले आहे.

आरजी जागा ह्या फ्लॅट विकत घेणाऱ्या रहिवाश्यांच्या हक्क व मालकीच्या असतात . मात्र संगनमताने रहिवाश्यांच्या जागा बळकावण्यात आल्याने हक्कासाठीचा हा लढा आहे . आरजी जागा रहिवाश्याना मिळवून देणे शासन - पालिकेचे कर्तव्य आहे असे रहिवाशी म्हणाले.

रहिवाश्यांच्या जागेत बळजबरी करून बेकायदा बांधकामाच्या संरक्षणा साठी त्याला धार्मिक स्थळे दाखवली गेली . कारवाई वरून  त्याचा धार्मिक मुद्दा करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या मालकी जागेत धार्मिक स्थळे उभारून द्यावीत  असा सल्ला देखील येथील काही रहिवाश्यांनी विरोधकांना दिला आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे