शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

तळवलकरांमुळे अनेक अभिनेत्रींना चित्रपटात संधी- सुहास जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 01:07 IST

रंजना जाईपर्यंत कुणालाच संधी नव्हती, प्रेक्षकांसमोर उलगडल्या गमतीजमती

ठाणे : रंजनाबाई जाईपर्यंत मराठीसिनेमांमध्ये काम करण्याची संधी कोणत्याही मराठी अभिनेत्रीला मिळाली नाही. त्यांच्या अपघातानंतर सविता प्रभुणे, निवेदिता सराफ यांना मराठी चित्रपटांत संधी मिळाली. त्यानंतर, स्मिता तळवलकर यांनी चित्रपट काढले, तेव्हा एका कुटुंबासारखे आम्ही राहू लागलो. त्यांच्यामुळे मराठी सिनेमांत काम करण्याची संधी अनेक अभिनेत्रींना मिळाली, असे स्पष्ट वक्तव्य अभिनेत्री सुहास जोशी यांनी जोश्यांच्या लेकी-सुना या कार्यक्र मात केले.इंद्रधनू संस्थेतर्फेगुरुवारी सहयोग मंदिर येथे हा कार्यक्र म आयोजित केला होता. सुहास जोशी पुढे म्हणाल्या की, नाटक करण्याकडेच माझा अधिक कल होता. मला सिनेमाचे काडीचे आकर्षण नव्हते. चित्रपट, मालिकांमध्ये काम केल्यावर कलाकार प्रसिद्ध होतात, त्यामुळे कितीही वाईट मालिका किंवा चित्रपट असो, त्या आम्हाला कराव्या लागतात. त्याशिवाय, प्रेक्षक नाटक बघायला येत नाहीत. एकदा सुरू झालेल्या मालिका केव्हा बंद होतील, हे ब्रह्मदेव जरी खाली अवतरला, तरी सांगू शकणार नाही, असे सांगताना त्यांनी सई परांजपे, अरुण जोगळेकर, विजया मेहता यांच्यासोबत काम करतानाच्या गमतीजमती प्रेक्षकांसमोर उलगडल्या. डेलीसोप मालिकांबद्दल त्या म्हणाल्या की, तेथे लिहिणाऱ्याला, सादर करणाºयाला, निर्मात्याला कोणालाच आपण काय करत आहोत, हे माहीत नसते. मी आयुष्यात खूप बिझी अ‍ॅक्ट्रेस कधी नव्हते, हिंदी सिनेमा कधी माझ्या आवडीचे नव्हते, मराठी सिनेमांमध्ये आवडीच्या भूमिका केल्याचे त्यांनी सांगितले. गायिका मृदुला दाढे-जोशी यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक गुरूने गाण्याची नजर दिल्याचे सांगितले. यावेळी सोनालिका जोशी यांनी बालपणीच्या आठवणी सांगितल्या.कवितेचे गाणे करताना कवीने लिहिलेल्या शब्दांना न्याय देण्याबरोबरच दोन वाक्यांमधील अर्थदेखील आपल्या गाण्यातून समोरच्यापर्यंत पोहोचावेत, यासाठी नेहमीच प्रयत्न करत असल्याचे मृदुला दाढे-जोशी यांनी यावेळी सांगितले.मृदुला यांनी मृदुल करांनी छेडीत तारा आणि तुम्हावरी केली मी मर्जी बहाल, ही लावणीची झलक प्रेक्षकांसमोर सादर केली. यावेळी त्यांच्या या झलकेला प्रेक्षकांनी दाद दिली. अभिनेत्री पल्लवी जोशी आणि अभिनेत्री पद्मश्री जोशी यांनी लहानपणीच्या आठवणी जागवल्या.याचवेळी त्यांनी सुहास जोशी यांच्या मालिका कधी संपतील, हे निर्मात्याला माहीत नसे. या वाक्याला दुजोरा देऊन पल्लवी जोशी यांनी सध्या वेबसिरीजसाठी काही नवीन संकल्पना असून त्या प्रेक्षकांना लवकरच पाहावयास मिळतील, असे सांगितले.

टॅग्स :entertainmentकरमणूकmarathiमराठीcinemaसिनेमा