शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यातील पूल वाहतुकीसाठी खुला करा; माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 10:42 IST

ज्याला ठाण्याला जायचे असते त्याला कळवा पुल ओलांडावाच लागतो. पण, तो पुल ओलांडत असताना ठाण्यातील वाहतुकीची कोंडी कळव्यात वाहतुक कोंडी निर्माण करते.

ठाणे - पावसाळा सुरु झाल्यापासून ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी सुरु आहे. रस्त्यावरील खड्डे आणि शहरात येणारी जड वाहने याला कारणीभूत आहेत. याच विषयावर लक्ष वेधत राष्ट्रवादी नेते माजी मंत्री डॉ जितेंद्र आव्हाडांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कळव्यातील तिसरा पुल बांधून तयार असून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून विशिष्ट वेळेतच जड वाहनांना परवानगी देण्याची मागणी केली आहे. 

पत्रामध्ये आव्हाड म्हणतात "2013-14 साली जेव्हा असीम गुप्ता हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते, तेव्हा कळव्याचा खचल्यानंतर दुस-या पुलाची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यावर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता त्यावर पहिला पुल उपाय म्हणून कळवा खाडीवर तिस-या पुलाची निर्मिती करावी अशी मी त्याच्याकडे मागणी केली आणि त्याला असीम गुप्ता यानी त्वरीत मान्यता दिली व त्या कामाला सुरुवात देखील झाली. कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता जवळ-जवळ वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतुक कोंडीने लोक हैराण झाले आहेत. कळव्यातल्या कळव्यात प्रवासासाठी नागरिकांना कुठेही अडचण येत नाही. कारण कळव्यात कुठल्याही रस्त्यांवर खड्डे नाहीत. परंतु मात्र ज्याला ठाण्याला जायचे असते त्याला कळवा पुल ओलांडावाच लागतो. पण, तो पुल ओलांडत असताना ठाण्यातील वाहतुकीची कोंडी कळव्यात वाहतुक कोंडी निर्माण करते. खरतरं उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कळव्यामध्ये विशिष्ट वेळेत जड वाहनांना वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण त्या गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.आतामात्र सगळ असाह्य व्हायला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा बुडत आहेत. नोकरीला जाण्यासाठी उशीर होत आहे आणि ही अस्वस्थता आता शिगेला पोहचली आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच नागरिकांची काहीच चूक नाही. चूक कोणाची हेही मला सांगायचे नाही. परंतु कमीत कमी जो ब्रिज तयार झाला आहे तो नागरिकांच्या वापरासाठी सुरु करा. जेणेकरुन थोडीफार वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल. आपण त्वरीत हा निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. खरतर पोलीस आयुक्तांनी उच्च न्यायालयाचा आदेश मानायला पाहिजे व तशी वाहतुकीची व्यवस्था करायला हवी. पण, हे कितीवेळा आणि कोणाला सांगायचे. उच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवणार असाल तर मग तक्रारच कोणाकडे करायची. मला वाटते कायद्याचे पालन व्हायला हवे. उच्च न्यायालयाचे आदेश मानायला हवेत." अशी मागणी आव्हाडांनी पत्राद्वारे पोलीस आयुक्ताकडे केली आहे. त्यामुळे हा पूल कधी  सुरु होईल हे पाहणं महत्वाचं आहे

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड