शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा संपन्न, ‘इव्हॅल्युएशन - अ क्वेशन मार्क’ सर्वोत्कृष्ट एकांकिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:01 IST

कोकण विभागीय खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी गडकरी रंगायतन येथे पार पडला.

ठळक मुद्दे‘इव्हॅल्युएशन - अ क्वेशन मार्क’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिकाज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा सन्मानव्यक्ती आणि वल्ली नाटकातील बालकलाकारांचा, नाटकाचे दिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू यांचा सत्कार

ठाणे: कोकण कला अकादमी आणि संस्कार आयोजित कोकण विभागीय खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत दादर येथील नाट्यकिर्तीची ‘इव्हॅल्युएशन - अ क्वेशन मार्क’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. ठाण्याच्या नाट्यमय संस्थेची ‘क ला काना का’ या एकांकिकेने द्वीतीय तर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ‘निर्वासित’ एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला. या पारितोषिक सोहळ््याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा सन्मान करण्यात आला.        पारितोषिक वितरण सोहळ््याला आ. संजय केळकर, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष दीपक करंजीकर, कोकण कला अकादमीचे कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, सदस्य विक्रांत महाडीक, वाडेकर संस्कारचे सेक्रेटरी संतोष साळुंके आदी उपस्थित होते. मोहन जोशी यांनी स्पर्धेचे आणि आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘मॅडम’ व सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या ‘पाझर’ या एकांकिकांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ‘शुभयात्रा’ या एकांकिकेला विशेष पारितोषिकाने गौरविण्यात आले. रोहीत मोहिते (शुभयात्रा) हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर उत्तेजनार्थ म्हणून विशाल चव्हाण (क ला काना का) तर सिद्धेश उपकारे (सेकंड इनिंग) यांना गौरविण्यात आले. सायली बांदकर (निर्वासित) ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. उत्तेजनार्थ म्हणून सोनाली मगर (दर्दपोरा), स्मितल चव्हाण (मॅडम) तसेच, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून साबा राऊळ (इव्हॅल्युएशन - अ क्वेशन मार्क), सर्वोत्कृष्ट लेखक ओमकार राऊत (शुभयात्रा), सर्वोत्कृष्ट नेपथ्य सानिक (निर्वासित), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत निरांत, अरविंद, उन्मेश (पाझर), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना श्याम चव्हाण (दर्दपोरा) यांना गौरविण्यात आले. परिक्षकांच्यावतीने विनायक दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, व्यक्ती आणि वल्ली नाटकातील बालकलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन आणि या नाटकाचे दिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. ढवळ यांनी प्रास्ताविक तर देवराज साळवी याने निवेदन केले. यंदाच्या स्पर्धेचे १२ वे वर्ष होते. सहा जिल्ह्यांची घेण्यात आलेली प्राथमिक फेरी ठाणे, पालघर, रत्नागिरी या तीन केंद्रांवर पार पडली. २८ नाट्यसंस्थांनी यात भाग घेतला होता. अंतिम फेरीसाठी १० एकांकिकांची निवड करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकkonkanकोकण