शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सात जिल्ह्यातील कांदळवन संरक्षण, संवर्धनासाठी आता एकच सनियंत्रण समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 17:38 IST

सागर किनारा असलेल्या ७ जिल्ह्यांकरिता कांदळवन संरक्षण व संवर्धणासाठी आता एकच सनियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला

ठाणे : सागर किनारा असलेल्या ७ जिल्ह्यांकरिता कांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी आता एकच सनियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून कोकण विभागीय आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील. यापूर्वी नवी मुंबई तसेच मुंबई व मुंबई उपनगर यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सनियंत्रण समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांच्या स्वाक्षरीचा शासन निर्णय जारी केला आहे.मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या ७ जिल्ह्यांसाठी आता खालीलप्रमाणे ही समिती असेल. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सह अध्यक्ष), पोलीस आयुक्त मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पोलीस अधीक्षक मुंबई वगळून सर्व जिल्हे, आठ पालिकांचे आयुक्त, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक ठाणे, कोल्हापूर, एमएमआरडीए, सिडको, म्हाडा, एमआयडीसी, एसआरए, सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सागरतटीय क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपवनसंरक्षक कांदळवन, नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटी, वनशक्ती, बॉम्बे एन्व्हायर्नमेंट एक्शन ग्रुप, महाराष्ट्र मच्छीमार कृती संघ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री यांचे प्रतिनिधी देखील या समितीत असतील.या समितीचे कार्य कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाच्या मर्यादेत परंतु व्यापक स्वरूपाचे असून यात मध्यवर्ती तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे, उपाययोजना सुचविणे , सीसीटीव्ही पाळावे व निगराणी अशा अनेक बाबींचा समवेश आहे. या समितीने आपला पहिला अनुपालन अहवाल १ डिसेंबर २०१८ पूर्वी उच्च न्यायालयाला सादर करावयाचा आहे.