शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

केवळ सत्काराचेच आश्वासन, अग्निशमनच्या मागण्या दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:46 IST

केडीएमसीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना जोखीम भत्ता देणे, रिक्त पदे भरणे, दुसरा व चौथा शनिवार सुटी देणे या व अशा मागण्यांवर कुठलीच कृती न करता केवळ उल्लेखनीय कामगिरी करणा-या

- प्रशांत मानेकल्याण : केडीएमसीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना जोखीम भत्ता देणे, रिक्त पदे भरणे, दुसरा व चौथा शनिवार सुटी देणे या व अशा मागण्यांवर कुठलीच कृती न करता केवळ उल्लेखनीय कामगिरी करणाºया कर्मचाºयांचा प्रजासत्ताक दिनी व स्वातंत्र्य दिनी सन्मान करण्याच्या दिखाऊ आश्वासनावर या कर्मचाºयांची महापालिका प्रशासनाने बोळवण केली आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना या कामगारांचे नेतृत्व करणाºया भारतीय कामगार सेनेनी तलवार म्यान कशी केली, असा सवाल अग्निशमन कर्मचारीच करीत आहेत.अग्निशमन कर्मचाºयांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता १ ते १५ जून या कालावधीत ‘काळी फीत’ आंदोलन छेडले होते. २६ जूनला रमजान ईदच्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. महिनाभरात मागण्यांबाबत ठोस कार्यवाही करण्याच्या प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.अग्निशमन विभागातील रिक्त पदांवर नवीन भरती, सुट्टीच्या दिवशी जादा काम केल्याचा मोबदला या व अशा मागण्यांकरिता भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले होते. ९० कर्मचाºयांनी सामूहिक रजेचे अर्ज सामान्य प्रशासन विभागाला सादर केले. कर्मचाºयांचा आक्रमक पवित्रा पाहून महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासन आणि संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी संघटनेचे केडीएमसी युनिटचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड आणि सुधाकर कुलकर्णी उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेचा अहवाल पुढील महासभेत सादर करून महिनाभरात ठोस कृती केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परिणामी सामूहिक रजा आंदोलन मागे घेत असल्याचे संघटनेने जाहीर केले. याबाबत अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुन त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला.कर्मचाºयांच्या प्रमुख मागण्या व आश्वासनेकर्मचाºयांना विशेष वेतन जोखीम भत्त्यापोटी दरमहा फायरमन यांना ३८० रूपये आणि लिडींग फायरमन ते अधिकारी यांना ४०० रूपये.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मोबदला.अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करणार, अधिकारी-कर्मचारी यांची एकूण ५२ रिक्त पदे भरणार. तोपर्यंत उपलब्ध कर्मचाºयांकडून करुन घेण्यात येणाºया अतिरिक्त कामाचा मोबदला देणार.सेवाज्येष्ठता यादीतील त्रुटींसंदर्भात बैठक घेणार.उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया कर्मचाºयांचा २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) व १५ आॅगस्ट (स्वातंत्र्य दिनी) विशेष सत्कार करणार. उल्लेखनीय कामगिरी करणाºयांना मागील १५ आॅगस्टला देण्यात आलेले पुरस्कार वगळता उर्वरीत एकही प्रमुख मागणी प्रशासनाने पूर्ण केलेली नाही.आर्थिक चणचणीचे कारण पुढे करीत प्रशासन अग्निशन कर्मचाºयांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास टाळाटाळ करीत आहे. अन्य महापालिकांकडून माहिती मागवत असल्याचे सांगून वेळकाढू धोरण अवलंबत आहे. आश्वासनाच्या पूर्ततेकरिता पुन्हा प्रशासनाला स्मरणपत्र दिले जाईल.’’-कैलास शिंदे, अध्यक्ष, भारतीय कामगार संघटना, कल्याण युनिट

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका