शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १७ हजार रिक्षा चालकांनी भरला अनुदानासाठी आॅनलाइन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 01:19 IST

ठाण्यात ८४ हजार परवानाधारकांपैकी १७ हजार रिक्षा चालकांनी अनुदानासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. इतरांना आधारकार्डची समस्या उद्भवू नये, यासाठी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दोन ठिकाणी तात्पुरते विशेष आधार केंद्र सुरु केले आहेत.

ठळक मुद्दे आरटीओ कार्यालयाने दिला आधार दोन ठिकाणी सुरु केली तात्पुरती विशेष आधारकेंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांसाठी लॉकडाऊनच्या काळात सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासाठी काही तांत्रिक अडचणींपैकी आधारकार्डचीही एक समस्या आहे. ठाण्यात ८४ हजार परवानाधारकांपैकी १७ हजार रिक्षा चालकांनी अनुदानासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. इतरांना आधारकार्डची समस्या उद्भवू नये, यासाठी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दोन ठिकाणी तात्पुरते विशेष आधार केंद्र सुरु केले आहेत.लॉकडाऊनच्या काळात परवानाधारक रिक्षा चालकांना शासनाकडून दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य घोषित केले आहे. अर्थात, असे असले तरी तांत्रिक तसेच इतर काही अडचणींमुळे ते मिळविण्यासाठी या रिक्षा चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यात प्रामुख्याने आधारकार्ड वरील नाव अथवा मोबाईल क्र मांक जोडणे ही एक मोठी समस्या आहे. त्यात काही महिला रिक्षा चालकांचे माहेरचे नाव आणि सासरच्या नावात अधिकृत बदल न झाल्यामुळे त्यांनाही काही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काहींचे तर बँकेत खातेही नाही. ज्यांना आधारकार्डमुळे अनुदान मिळविण्यात अडचणी येत आहेत, त्यांच्या त्या दूर होण्यासाठी ठाणे आरटीओ कार्यालयात आधार केंद्राला परवानगी मिळावी, अशी मागणी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांच्याकडे रिक्षा चालकांच्या काही संघटनांनी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करुन जिल्हाधिकऱ्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतील उपप्रादेशिक कार्यालयात ही तात्पुरती स्वरूपाची आधारकेंद्र ३ जून पासून कार्यान्वित केली. ठाण्यात जिल्हा कारागृहासमोरील तसेच एलआयसी कार्यालयाजवळ असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या आवारातही ही आधारकेंद्र रिक्षा चालकांसाठी सुुरु झाली आहेत. आता या केंद्रांवर आधारकार्ड काढून त्याद्वारे अनुदान मिळविण्यासाठी रिक्षा चालकांना सुलभ होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी दिली. ठाणे विभागांतर्गत ८४ हजार रिक्षांची अधिकृत नोंदणी आहे. त्यातील आतापर्यंत १७ हजार चालकांनी अनुदानासाठी आॅनलाईन अर्ज केला आहे. इतरांनीही योग्य कागदपत्रे जोडून या अनुदानासाठी अर्ज करावेत. तसेच ज्यांच्याकडे आधारकार्डची समस्या असेल त्यांनी ठाण्यातील आरटीओ कार्यालयाच्या आवारातील आधारकेंद्रावर ती काढून घ्यावीत, असे आवाहनही आरटीओ कार्यालयाने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी