शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर, सामान्यांचे कंबरडे मोडले; बटाट्यानेही गाठले अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 11:32 IST

गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे दर वाढतच आहेत. पाहतापाहता कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा आता शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यापाठोपाठ बटाट्यानेही उच्चांक गाठला आहे. कोरोनाने अगोदरच खिशाला कात्री लावलेली असताना कांदा, बटाट्याच्या वाढलेल्या दराने कंबरडे मोडले असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे दर वाढतच आहेत. पाहतापाहता कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. कांद्यापाठोपाठ बटाटाही महाग होत चालला आहे. रोजच्या जेवणात कांदा हा अविभाज्य घटक असून, बटाट्यालाही नेहमीच मागणी जास्त असतो. मात्र या वाढलेल्या भावाने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत.  अहमदनगर, पुणे, नाशिक येथून कांद्यांची आवक होते. जुना कांदा संपत आल्याने माल कमी पडत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याची आवक मंदावली आहे. पावसामुळे नवीन कांदा येत नाही आणि पिकेही लांबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढे कांदा शंभरीच्या वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कांदा, बटाट्याचे व्यापारी संदीप चौधरी यांनी सांगितले.

बटाट्याची सर्वाधिक आवक ही उत्तरप्रदेशमधून होते. गेल्यावर्षी त्या ठिकाणी बटाट्याचे अपेक्षित उत्पादन न झाल्याने त्याचा परिणाम यावर्षीच्या आवकवर होत आहे. या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये बटाट्याची लागवड केली जात आहे.त्यामुळे लागवडीसाठीही बटाटा लागत आहे. या आणि इतर कारणांमुळे मागणीच्या तुलनेत बटाट्याचा माल येणे कमी झाल्यामुळे भाव वाढले आहेत. सर्वसाधारण बटाटा २५ ते ३० रुपये किलोप्रमाणे विकला जातो. परंतु, यंदा ५० वर येऊन पोहोचला असल्याचे चौधरी यांनी सांगितले. 

टॅग्स :onionकांदाthaneठाणेMarketबाजार