शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने केले शतक पार, खरेदी-विक्री घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 02:53 IST

अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे ८० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याने आता चक्क शंभरी गाठली आहे.

ठाणे : अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे ८० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याने आता चक्क शंभरी गाठली आहे. जुना कांदा संपत आल्याने आणि नव्या कांद्याचा दर्जा खालावल्याने कांद्याची आवक प्रचंड घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याचे कांदाविक्रेत्यांनी लोकमतला सांगितले.अवकाळी पावसाने कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओतूर, जुन्नर, नगर या ठिकाणांहून ठाण्याच्या बाजारपेठेत कांद्याची आवक होत असते. जुना कांदा आता संपत आला आहे. जुन्या कांद्याचे प्रमाण पाच ते १० टक्क्यांवरून आता एक ते दोन टक्क्यांवर आले आहे. विक्रेत्यांकडे आता इतकाच जुना कांदा शिल्लक आहे. अशातच अवकाळी पावसाचा फटका नवीन कांद्याला बसल्यामुळे नवीन कांदाही चांगला येत नाही. एकूणच परिस्थितीमुळे कांद्याची आवक ५० टक्के घटली असल्याची माहिती कांदाविक्रेते संदीप चौधरी यांनी दिली.२२ आॅक्टोबरपासून बाजारपेठेत कांद्याच्या दरात वाढ होत गेली. त्यावेळी कांदा किरकोळ बाजारात ५० रुपये, तर होलसेल बाजारात ४० रुपये किलो, चार ते पाच दिवसांनंतर हाच कांदा १० रुपयांनी वाढून किरकोळ बाजारात ६० रुपये, तर होलसेल बाजारात ५० रुपये किलोवर भाव पोहोचले. ३० आॅक्टोबर रोजी पुन्हा कांद्याचे दर वाढून किरकोळ बाजारात ७० आणि होलसेल बाजारात ६० रुपये किलो दराने कांदा विकला जाऊ लागला.४ नोव्हेंबरपासून हाच कांदा होलसेल बाजारात ६५ ते ७० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो दराने विकला जात होता. काही दिवसांनी कांद्याचे दर पुन्हा कडाडले. ठाण्याच्या होलसेल बाजारात जुना कांदा ८५ ते ९० रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलोने तसेच नवीन कांदा होलसेल बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. रविवारी होलसेल बाजारात जुना कांदा ९0 ते १00 रुपये, तर किरकोळ बाजारात हाच कांदा १00 ते ११0 रुपये किलोने विकला गेला. नवीन कांदा होलसेल बाजारपेठेत ७0 ते ८0 रुपये आणि किरकोळ बाजारपेठेते ९0 ते १00 रुपये किलोप्रमाणे विकला. नवीन कांद्याचा दर्जा चांगला नसल्याने ५० टक्के चांगला आणि ५० टक्के खराब कांदा येत आहे. कांद्याचे दर कमी व्हायला कमीतकमी एक महिना तरी जाईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.मागणीत मोठी घसरणहॉटेलवाल्यांना एरव्ही दररोज १० कांद्याच्या गोण्या विकल्या जात होत्या. आता तीन ते चार गोण्याच जात आहेत. ठाणे शहरात एरव्ही १५०० ते १६०० टन कांदा दररोज विकला जातो. परंतु, सध्या १०० टनच विकला जात असल्याचे कांदा विक्रेते संदीप चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :onionकांदाMarketबाजारthaneठाणे