शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदातीच्या प्रतिक्षेत पुण्यातील एक वर्षाची मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 00:59 IST

ठाण्याच्या रामनगर भागात राहणाऱ्या सुकन्या अजय जाधव (२२, नावात बदल) या कथित विवाहितेने मुलीला जन्म दिल्यानंतर तिने तिच्या काव्या या मुलीला पुण्याच्या ससून रुग्णालयाजवळील ‘सोफोश’ या संस्थेत एक वर्षभरापूर्वी म्हणजे ३१ मार्च २०२० रोजी ठेवले. मात्र, कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण न करताच ती बेपत्ता झाली आहे.

ठळक मुद्दे पुण्याच्या बंडगार्डन मध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याच्या रामनगर भागात राहणाऱ्या सुकन्या अजय जाधव (२२, नावात बदल) या कथित विवाहितेने मुलीला जन्म दिल्यानंतर तिने तिच्या काव्या या मुलीला पुण्याच्या ससून रुग्णालयाजवळील ‘सोफोश’ या संस्थेत एक वर्षभरापूर्वी म्हणजे ३१ मार्च २०२० रोजी ठेवले. मात्र, कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण न करताच ती बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोफोश या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील रामनगर येथील या कथित विवाहितेने ९ मार्च २०२० रोजी पुण्याच्या ससून रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर आपण बाळाची काळजी घेण्यास असमर्थ असल्याने काव्या या मुलीला पुण्याच्या बाल कल्याण समितीच्या आदेशाने सोफोश या संस्थेत काळजी व संरक्षणासाठी दाखल करीत असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये तिने आपल्या मुलीला या संस्थेत ठेवले. परंतू, त्यानंतर सुकन्या हिच्याशी संपर्क होत नसल्यामुळे काव्या हिच्या पुढील पुनर्वसनाबाबतचा निर्णय घेण्यात काही अडचणी येत आहेत. मुलीच्या आईच्या शोधासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आली आहे. तरी मुलीच्या आईने किंवा तिच्या अन्य पालकांनी या संस्थेकडे सोफोश, ससून रुग्णालय, पुणे येथे किंवा बाल कल्याण समिती येरवडा, पुणे येथे सपर्क साधावा, असे आवाहन सोफोशच्या समीक्षा महाबळेश्वरकर यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी