शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मंदीमुळे कारखान्यांना एक हजार कोटींचा तोटा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 01:33 IST

डोंबिवली, अंबरनाथमध्ये उद्योग डबघाईला : उत्पादनांच्या आॅर्डर ३० टक्क्यांनी घटल्याचा केला दावा; कारखानदार कठोर निर्णय घेणार?

मुरलीधर भवारकल्याण : जागतिक मंदीचा फटका कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील औद्योगिक कारखान्यांना बसायला सुरुवात झाली असून या कारखान्यांतील उत्पादनाच्या आॅर्डर ३० टक्क्यांनी घटल्याने कारखान्यांना या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे काही कारखान्यांच्या मालकांपुढे कामगारांचा पगार कुठून द्यायचा, असा प्रश्न उभा आहे. सध्या कारखानदारांनी कामगारांना ‘ले आॅफ’ अथवा ‘ब्रेक’ दिलेला नसला, तरी लागलीच आर्थिक परिस्थिती सुधारली नाही तर भविष्यात अनेक कटू निर्णय घेण्याची वेळ कारखान्यांच्या मालकांवर येऊ शकते. काही कारखानदारांनी कामगारांना गणपतीची सुटी दिली आहे.कल्याण, अंबरनाथ कारखानदार संघटनेचे सभासद ७५० कारखानामालक आहेत. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात जवळपास एक हजारच्या आसपास कारखाने आहे. त्यापैकी ४३२ कारखाने हे केवळ डोंबिवली औद्योगिक परिसरात आहेत. त्यामध्ये टेक्सटाइल्स, इंजिनीअरिंग, फॅब्रिकेशन, औषध कंपन्या, रासायनिक कंपन्यांचा समावेश आहे. या औद्योगिक कारखान्यांत जवळपास ७५ हजार कामगार काम करतात. या कंपन्यांना लहान आकाराचे सुटे पार्ट पुरवणारे छोटे उद्योजकही आहेत. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या ३० हजार आहे. ठाणे जिल्ह्यातील या औद्योगिक क्षेत्राला जागतिक मंदीची झळ बसायला सुरुवात झाल्याने एक लाख पाच हजार कामगारांची रोजीरोटी धोक्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले की, सध्या ३० टक्के आॅर्डर घटल्या आहे. ही स्थिती सुधारली नाही, तर पुढे काय होईल, याविषयी अनिश्चिततेचे वातावरण आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून कामगारांना अद्याप कारखानामालकांनी घरी बसवले नाही. गणपतीची सुट्टी दिली आहे. ७० टक्के कारखान्यांत ही स्थिती आहे. आॅर्डर मिळाली नाही. तयार केलेले उत्पादन विकले गेले नाही तर कामगारांचा पगार कुठून द्यायचा आणि प्लांट कसा चालवायचा, असा प्रश्न कारखानदारांसमोर आहे.जीएसटी कमी केल्यास फरक पडेल?संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी म्हणाले की, मी संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याचबरोबर माझा कारखाना आहे. माझ्याकडे बॉयलर तयार करण्याच्या आॅर्डर येत नाहीत. काही कारखानदारांच्या मते जीएसटी कमी केल्यावर फरक जाणवेल. मात्र, जीएसटी कमी करूनही मंदीची झळ काही कमी होणार नाही.मंदीची झळ सुरू असताना केडीएमसी आणि औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक परिसरात चांगले रस्ते करून देत नाही. एखादा ४० टन वजनाचा स्क्रॅपचा ट्रक कळंबोलीवरून डोंबिवलीत यायचा असेल, तर ट्रकचा चालक १० हजार रुपये जास्तीचे भाडे मागतो. कोंडी आणि खराब रस्त्यामुळे ही जास्तीच्या भाड्याची मागणी होते.अलीकडेच डोंबिवलीतील रस्त्यांसाठी ४०० कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर झाल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यांच्या रस्त्यांच्या यादीत औद्योगिक विभागातील एकही रस्ता नाही. औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना रस्त्याच्या सुविधेपासून वाळीत टाकले आहे का व कारखानदार मतदार नाही का, असा त्यांचा सवाल आहे. 

टॅग्स :thaneठाणेGSTजीएसटीEconomyअर्थव्यवस्था