शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
2
कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..."
3
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
4
IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी?
5
Putin: रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुतिन सकारात्मक; पण झेलेन्स्कींसमोर ठेवली 'अशी' अट!
6
तुमचे जुने आणि फाटकी अंतर्वस्त्रे देशाच्या अर्थव्यवस्थेचं सिक्रेट सांगतात! काय आहे 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स'?
7
Mumbai Crime: "पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा!
8
Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक
9
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लेकीचं केलं बारसं, ठेवलं हे युनिक नाव
10
ड्रोन हल्ल्यात ३ चीनी इंजिनिअर ठार, अफगाणिस्तानच्या सीमेजवळ सोन्याच्या खाणीत काम करत होते
11
बँक, शेअर, डिविडेंड, इन्शुरन्स.... आता सिंगल पोर्टलवर मिळणार दावा न केलेला पैसा, काय आहे सुविधा?
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
14
महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण
15
Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
16
सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; रेड झोनमध्ये सेन्सेक्स, निफ्टी; Asian Paints, Max Health, Eicher टॉप लुझर्स
17
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
18
९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाजं भारतात पोहोचली; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
19
Crime: विम्याचे ५० लाख हडपण्यासाठी पुतळ्यावर अंत्यसंस्कार, एका चुकीमुळे फसले! दोघांना अटक!
20
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-गायमुख कोस्टल रोडचे एक पाऊल पुढे; वाहतूक कोंडीतून सुटका होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 08:24 IST

या प्रकल्पामुळे खारफुटी क्षेत्र बाधित होत असून ठाणे महापालिकेने कोस्टल रोडसाठी हरित क्षेत्र, कारशेड, मुंबई महापालिका जलवाहिनीच्या आरक्षणात बदल करण्याचे प्रस्ताव आधीच मंजूर केले आहेत

नारायण जाधव

ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी घोडबंदर ते गायमुख आणि गायमुख ते ठाणे या १३ किमी लांबीच्या कोस्टल रोडच्या मार्गातील वनजमिनीचा अडथळा लवकरच दूर होणार आहे. या मार्गासाठी लागणारी २२ एकर ११ गुंठे जमीन रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यासाठी महसूल व वन विभागाने अपर प्रधान वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमली आहे,  मात्र, महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने या मार्गाचा आराखडा बदलून सहा ते आठ पदरी करण्यासह सध्याचा रस्ता कायमस्वरूपी बंद करून त्या जागी उन्नत मार्ग बांधण्याची शिफारस केली आहे. येत्या १५ दिवसांत ही समिती याबाबतचा अहवाल सादर करणार आहे. 

या प्रकल्पामुळे खारफुटी क्षेत्र बाधित होत असून ठाणे महापालिकेने कोस्टल रोडसाठी हरित क्षेत्र, कारशेड, मुंबई महापालिका जलवाहिनीच्या आरक्षणात बदल करण्याचे प्रस्ताव आधीच मंजूर केले आहेत. प्रस्तावित रस्ता आणि विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये तफावत निर्माण झाली असून ती दूर करण्यासाठी बाळकुम आणि खारी येथील हरित विभाग, कारशेड व मुंबई महापालिका जलवाहिनीसाठी आरक्षित ठेवलेले ४.७५०४ हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. 

सध्याचा रस्ता कायमस्वरूपी होणार बंदही समिती प्रस्तावित रस्त्याचे डिझाइन बदलून तो सहा ते आठ पदरी उन्नत करणे, त्यावरून जड व अवजड वाहने जातील हे पाहणे, सध्याचा रस्ता कायमस्वरूपी बंद करून तेथून वन्यप्राणी मुक्तसंचार कसे करतील, याचा अहवाल सादर करणार आहेत.

यांचा आहे समितीत समावेशमहसूल व वन विभागाने अपर प्रधान वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली  जी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे, त्यात भारतीय वन्यजीव संस्था, डाॅ. बिलाल हबीब, वॉईल्ड लाईफ कन्झर्वेशन मुंबईचे डॉ. मनिष अंधेरिया, रस्ते विकास महामंडळाचा प्रतिनिधी, संजय गांधी उद्यानाचे वन संरक्षक व संचालक यांचा समावेश आहे.