शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे ग्रामीणच्या वाहतूक विभागासाठी एक राज्य एक ई चलन योजना कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:09 IST

राज्य मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करतांना कारवाईमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी तसेच वाहन चालकांवर डिजीटल चलनाद्वारे कारवाईसाठी केंद्र शासनाच्या डिजीटल इंडिया या संकल्पनेतून राज्यात ‘एक राज्य एक ई चलन’ ही योजना राबविण्यात येत आहे. डिव्हाईसच्या मदतीने आता वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर आॅनलाईन कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्दे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते ४५ डिव्हाईस मशिनचे वाटपकाशीमीरा विभागात झाली सुरुपुराव्यासह कारवाईमुळे वादाला तसेच भ्रष्टाचारालाही आळा

ठाणे: एक राज्य एक ई चलन ही योजना ठाणे ग्रामीणच्या वाहतूक पोलिसांसाठी बुधवारपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते त्यासाठीचे ४५ डिव्हाईस मशिन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे आणि कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. याच डिव्हाईसच्या मदतीने आता वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर आॅनलाईन कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करतांना कारवाईमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी तसेच वाहन चालकांवर डिजीटल चलनाद्वारे कारवाईसाठी केंद्र शासनाच्या डिजीटल इंडिया या संकल्पनेतून राज्यात ‘एक राज्य एक ई चलन’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर कारवाईसाठी या कार्यप्रणालीची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यप्रणालीमध्ये डिव्हाईसद्वारे वाहतूक नियमभंग करणा-या वाहन चालकांकडून दंड वसूल केला जातो. ही यंत्रणा कॅमेरा रेकॉर्डींग पुराव्यासह परिपूर्ण असल्यामुळे आणि यात किमान मानवी हस्तक्षेप असल्याने अधिक पारदर्शकता आहे. पुराव्यासह कारवाई होत असल्यामुळे वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यातील वादाला तसेच भ्रष्टाचारालाही आळा बसणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कार्यप्रणालीमुळे कारवाईची अमलबजावणी वाढल्याने वाहन चालकांमध्ये शिस्त वाढील लागून अपघातांनाही आळा बसणार आहे. वाहतूक पोलिसांच्या कारभारात पारदर्शकता आल्याने त्यांची प्रतिमा उंचावण्यासही वाव मिळणार आहे.१० एप्रिलपासून ठाणे ग्रामीण जिल्हयात कार्यान्वित झालेली ही योजना प्रथम काशीमीरा विभागात सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्यामध्ये ४५ डिव्हाईस आणि प्रिंटर वापरण्यात येणार असून त्याद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे.अशी मिळणार नागरिकांना सुविधाया योजनेमुळे संबंधित वाहतूकीचे नियम तोडणा-याला डेबिट किंवा क्रेडीट कार्डद्वारे तडतोड रक्कम भरता येणार आहे. एमटीपी या अ‍ॅप्लिकेशनद्वारे संबंधितांना त्यांच्या वाहनावर अगर वाहन चालविण्याच्या परवान्यावर प्रलंबित असलेले चलन आॅनलाईन तपासून पाहता येणार आहे. त्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. विशेष म्हणजे ही योजना कार्यान्वित असलेल्या महाराष्टÑातील कोणत्याही जिल्हयात किंवा शहरात तडजोड रक्कम भरता येणार आहे. 

‘‘ एक राज्य एक ई चलन ही योजना राबवितांना नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. तसेच तडतोड रक्कम भरण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य द्यावे. पुराव्यासह कारवाई होत असल्यामुळे वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यातील वादाला तसेच भ्रष्टाचारालाही आळा बसणार आहे.’’डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस