शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

डोंबिवलीतील दोन भावांचं मलेशियात अपहरण; सुटकेसाठी एक कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 06:52 IST

परदेशात व्यापारासाठी गेलेल्या कौस्तुभ वैद्य व रोहन वैद्य या दोन भावांचे मलेशियात अपहरण झाले असून अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.

डोंबिवली : परदेशात व्यापारासाठी गेलेल्या कौस्तुभ वैद्य व रोहन वैद्य या दोन भावांचे मलेशियात अपहरण झाले असून अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.डोंबिवलीत राहणाऱ्या वैद्य बंधूंची रॉक फ्रोझन फूड नावाची कंपनी असून फ्रोजन फूड डिमांड आणि सप्लाय हा त्यांचा व्यवसाय आहे. विशेषकरून मलेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांत दोन्ही बंधूंचे व्यवसायानिमित्त येणेजाणे असते.काही दिवसांपूर्वीच वैद्य बंधूंच्या रॉक फ्रोजन फूड्स कंपनीला मलेशियातील ग्राहक मिस ली फ्रोझन फूड्स यांच्याकडून व्यवसायाकरिता फोन आला. फोन आणि मेलवरून औपचारिक व्यवहार पूर्ण झाल्यावर १ आॅगस्टला उरलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी रोहन आणि कौस्तुभ मलिंडो एअर लाइन्सच्या विमानाने मलेशियाला गेले. तेथे ते दोघे ग्रॅण्ड आर्चेड नावाच्या हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती कौस्तुभने आपली पत्नी सायली यांना दिली. ठरल्याप्रमाणे २ आॅगस्टच्या दुपारी मलेशियातील ग्राहक मिस ली फ्रोजन फूडसोबत मीटिंग झाल्याचेही कौस्तुभने आपल्या पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवर कळवले. त्यानंतर, संध्याकाळी ६ वाजता पुन्हा मिस ली फ्रोजन फूडच्या प्रतिनिधींसोबत मीटिंग असून मीटिंगनंतर जेवणार असल्याचे कौस्तुभने पत्नीला कळवले.दि. २ आॅगस्टच्या रात्री साडेदहा वाजता रोहन आणि कौस्तुभचे वडील प्रकाश वैद्य यांच्या फोनवर मलेशिया येथील +६०११५१२२४९३६ या नंबरवरून फोन आला आणि पलीकडून घाबरलेल्या आवाजात कौस्तुभ बोलत होता. ‘‘आमचं अपहरण झालं आहे. एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे...’’ हा फोन येताच प्रकाश यांनी लगेच मलेशिया दूतावासाला फोन करून मुलांच्या अपहरणाची माहिती दिली. त्यांनी स्थानिक मलेशियन पोलिसांना तक्र ार करण्यास सांगितले.यानंतरच, दि. ३ आॅगस्टच्या रात्री १०.२६ ते ११.०२ पर्यंत रोहनने वडील प्रकाश यांच्या +६०१९५५६८१०४ या नंबरवरून ११ फोन कॉल केले. प्रत्येक फोन कॉल २८ सेकंदांचा होता. यामध्ये रोहन आम्ही ४८ तासांत परत येतोय एवढंच सांगत होता.दरम्यान, कौस्तुभच्या बँक खात्यातून २५ हजार रुपये काढण्यात आले. त्यानंतर, अपहरणकर्त्याने फोन करून ०४१३२३८५४७ हा फोन नंबर दिला आणि या नंबरवरून जी व्यक्ती फोन करील आणि ती जो बँक अकाउंट नंबर सांगेल, त्या अकाउंटमध्ये एक कोटी रूपये ट्रान्सफर करायला सांगितले. पण, वरील नंबरवरून अजूनही फोन आला नाही आणि कौस्तुभ तसेच रोहनचादेखील पुन्हा फोन आलेला नाही.याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्कझाला आहे. मात्र, रोहन आणि कौस्तुभचे अपहरण नक्की कोणत्या कारणांमुळे झाले? अपहरणकर्ता कोण? याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही.>कुटुंबाचे वाटेकडे लक्षया दोघांच्या अपहरणाची बातमी कळताच वैद्य कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, दोनतीन दिवसांपासून त्यांच्या घरी नातेवाइकांची रीघ लागली आहे. त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Kidnappingअपहरणdombivaliडोंबिवली