शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील एक लाख बालकांचे आज लसीकरण, पल्स पोलिओ मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 00:00 IST

Pulse Polio Campaign in Thane : कोरोनाच्या नियमांचे पालन करीत या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. 

ठाणे :  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ७६० बालकांसाठी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, १ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटांंतील बालकांचे लसीकरण करण्यासाठी पालकांनी त्यांच्या बालकांना जवळच्या बुथवर घेऊन जाणे आवश्यक असल्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांनी केले आहे. यासाठी मंगळवारी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुकाणू समितीची खास बैठक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांच्या खास उपस्थितीत पार पडली. त्यांनी जिल्ह्यातील उपस्थित डाॅक्टरांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जळगावकर आणि मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

भिवंडीतही  जनजागृतीभिवंडी : पालिका क्षेत्रात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार असून त्यासाठी भिवंडी पालिका प्रशासनाने जनजागृती केली आहे. त्याचा प्रारंभ महापौर प्रतिभा पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. या प्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.जी. खरात, डॉ. जयवंत धुळे, अधिकारी सुभाष झळके, बाळाराम जाधव, मिलिंद पळसुले आदी उपस्थित होते.

नऊ हजार ४१८  कर्मचारी सज्ज आरोग्य कर्मचाऱ्यांना या मोहिमेसाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मोहिमेसाठी नऊ हजार ४१८ कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याकरिता जिल्ह्यात एक हजार ७५ बुथ उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी दोन हजार ६२९ पथकांसह ५२६ पर्यवेक्षक पथक तयार केले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी २१५ बुथ पर्यवेक्षकांचे असणार आहेत. १५७ मोबाइल पथकही तैनात राहणार आहे.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्य