शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट धनादेशाद्वारे धान्य खरेदी करुन मुंबईच्या व्यापाऱ्याची एक लाख २१ हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 23:53 IST

दुकानासाठी धान्याची आॅर्डर देऊन त्याबदल्यात बनावट धनादेश देऊन एक लाख २१ हजारांची फसवणूक करणाºया भरत निमावंत ( रा. ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्दे भामटयास अटक कापूरबावडी पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दुकानासाठी धान्याची गरज असल्याची बतावणी करीत धान्याची आॅर्डर देऊन त्याबदल्यात बनावट धनादेश देऊन एक लाख २१ हजारांची फसवणूक करणाºया भरत निमावंत (४६, रा. शिवाईनगर, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून हे सर्व धान्य जप्त करण्यात आले आहेत.भरत निमावंत आणि त्याच्या साथीदाराने २४ आॅगस्ट २०२० रोजी मुंबईतील वरळी येथील व्यापारी रवींद्र श्रीपुरम यांना गहू, तुरडाळ, तांदूळ आणि मूगडाळीची आॅर्डर दिली. हे सर्व एक लाख २१ हजारांचे धान्य त्याने ठाण्यातील माजीवडा येथे मागविले. ठरल्याप्रमाणे या व्यापाºयाने माजीवडा येथे हे सर्व धान्य पाठविले. मात्र, याबदल्यात निमावंत याने या व्यापाºयाला दूसºयाच्याच नावाचा बनावट धनादेश दिला. या व्यापाºयाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, यापूर्वी मुंबईतील जोगेश्वरी येथील व्यापारी श्यामभुवन विश्वकर्मा (३६) यांना जैन मंदिरासाठी सिलिंग फॅन लागणार असल्याचीही त्याने बतावणी करीत त्यांना ७६ सिलिंग फॅनची आॅर्डरही दिली. या आॅर्डरचीही डिलिव्हरी त्याने ठाण्यातील कापूरबावडी नाका येथे २५ आणि २६ जुलै रोजी केली. त्याबदल्यात विश्वकर्मा यांनाही रोख पैसे देण्याऐवजी दुस-याच्या नावाचे बनावट एक लाख १९ हजारांचे धनादेश दिले. याबाबत ९ सप्टेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. याच प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने भरत याला शिवाईनगर येथून ९ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. त्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या पोलीस कोठडीतील चौकशी दरम्यान भरतने वरळीतील श्रीपुरम या व्यापाºयाचीही फसवणूक केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून आता हे धान्यही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी