शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

ठाण्यात कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 10:25 PM

घोडबंदर रोड येथून मोटारसायकलस्वाराच्या मागे बसून जाणाऱ्या जितेंद्र कुशवाह याचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमध्ये मोटारसायकलस्वार सिद्धेश जाधव हा सुदैवाने बचावला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देघोडबंदर रोडवरील घटना मोटारसायकल चालक सुदैवाने बचावलाकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार जितेंद्र कुशवाह (२३, रा. उथळसरनगर, ठाणे) या तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. त्याचा साथीदार सिद्धेश जाधव (१९, रा. किसननगर, ठाणे) हा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.संतोष सरोदे यांच्या नावावर असलेली ही मोटारसायकल सिद्धेश चालवत होता. त्याचा मित्र जितेंद्र हा मागे बसलेला होता. हे दोघेही २८ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडने जात होते. मानपाडा येथील दोस्ती इम्पेरिया इमारतीसमोरून ते जात असताना एका अज्ञात कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात सिद्धेश आणि जितेंद्र हे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास जितेंद्रचा मृत्यू झाला. सिद्धेश याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा अपघात नेमका कसा झाला, याचा उलगडा झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात