शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील वालधुनी नदीत  पडून एक इसम गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 23:00 IST

वडोलगाव व उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी नदीच्या पुलावरून एक व्यक्ती पडून वाहून गेला. रात्री साडे नऊ वाजता घटना घडली.

उल्हासनगर - वडोलगाव व उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी नदीच्या पुलावरून एक व्यक्ती पडून वाहून गेला. रात्री साडे नऊ वाजता घटना घडली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्र असल्याने उद्या सकाळी शोध घेणार आहेत.वडोलगावला जोडणारा वालधुनी पूल गेल्या वर्षी कोसळल्याने, पालिकेने नवीन  पूल बांधणीला पालिकेने परवानगी दिली.

तसेच गावकऱ्यांसह शालेय मुलांसाठी येण्या-जाण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा कच्चा पुल बांधला. पावसाळ्या पूर्वी नवीन पूल बांधण्याची अट होती. मात्र पुलाच्या सल्लागाराने पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. असा अहवाल पालिका आयुतांना दिल्यावर, तत्कालीन आयुक सुधाकर शिंदे यांनी  सुरक्षाची उपाय म्हणून पुलाचे काम बंद केले. त्याच दरम्यान पावसाळ्यात नदीवर बांधलेला पूल वाहून गेला. 

वडोलगावातील नागरिकांना 3 की.मी. चा वळसा घेउन शहरात यावे लागत असे. पालिकेने गावकरी व शालेय मुलांसाठी मोफत बससेवा चालू केली. मात्र गावकऱ्यांनी बस नको, पुलच हवा. अशी मागणी करून बस सेवा ठप्प पाडली. तसेच स्वखर्चाने व श्रमाने पुन्हा सिमेंटचा कच्चा पूल बांधला. त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू केली. तसेच अर्धवट पुलाचे काम सोमवार पासून सुरू झाले. यापूर्वी पुला अभावी एक लहान मुलांचा पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर एक तरुणांचा गावात रेल्वे रुळावरून जात असताना अपघात होउन मूत्यू झाला आहे.

याप्रकाराने गावात पालिके बाबत संताप व्यक्त होत आहे. पुन्हा शनिवारी रात्री साडे नऊ वाजता एक इसम सिमेंटच्या पुलावरून जात असताना नदीत पडून वाहून गेला. त्याचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांनी काहीवेळ घेतल्याची माहिती स्थानिक नगरसेवक गजानन शेळके यांनी दिली. अंधारामुळे अग्निशमन दलाचे जवान परत गेले असून सकाळी नदी पात्रात शोध घेणार आहेत.