भिवंडीत खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 06:31 PM2021-01-01T18:31:11+5:302021-01-01T18:32:03+5:30

मनपा प्रशासनाचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर

one girl dies after falling into a pit in Bhiwandi | भिवंडीत खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

भिवंडीत खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

Next

भिवंडी: भिवंडी शहरात मलनिस्सारण प्रकल्प राबविला जात असून या मध्ये ठेकेदार ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनी कडून भुयारी गटर व ठिकठिकाणी उदच्चन केंद्र बनविली जात आहेत . मात्र हे काम करतांना ठेकेदारांसह मनपा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणत्याही उपाययोजना राबविल्या नसल्याचे वारंवार समोर आले असतांना शुक्रवारी दुपारी शहरातील चव्हाण कॉलनी कोंडाजी वाडी या भागात उदच्चन केंद्र बनविण्यात येत असून तेथे सुमारे तिस फूट खड्डा खोदण्यात आला आहे .कोरोना काळात काम बंद असल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबके झाले आहे. शुक्रवारी नजीकच्या झोपडपट्टीतील गौसिया आरिफ शेख (वय ३) व रेहान इम्रान शेख (वय ५) ही दोन चिमुरडी मुले त्या ठिकाणी खेळत असताना त्यांचा तोल जाऊन ती पाण्यात बुडाली . नजीकच्या इमारतीवर काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी आरडा ओरड केल्याने परिसरातील नागरीकांनी पाण्यात उड्या मारून या दोन्ही मुलांना बाहेर काढून शहरातील स्व इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी गौसिया आरिफ शेख या ३ वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट केले .तर रेहान इम्रान शेख हा ५ वर्षांचा चिमुरडा हा या दुर्घटनेत वाचला असून त्यावर उपचार सुरू आहेत .या दुर्घटने नंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून  शांतीनगर पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी व आयजीएम रुग्णालय परिसरात दाखल होत येथील परिस्थिती आटोक्यात आणली आहे .

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून येथे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सुरक्षा रक्षक ठेवणे गरजेचे असताना ते न ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याने कंपनी विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल कराव अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे .

Web Title: one girl dies after falling into a pit in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.