शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सरनाईक यांचा निकटवर्तीय चांडाेळेला एक दिवसाची ईडी कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:07 IST

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय अमित चांडाेळे याला विशेष पीएमएलए न्यायालयाने ८ डिसेंबरपर्यंत म्हणजेच अवघ्या एक दिवसाची ईडी कोठडी सुनावली.

मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय अमित चांडाेळे याला विशेष पीएमएलए न्यायालयाने ८ डिसेंबरपर्यंत म्हणजेच अवघ्या एक दिवसाची ईडी कोठडी सुनावली. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने चांडाेळे याचा ताबा मिळावा, यासाठी विशेष न्यायालयाला ईडीच्या अर्जावर पुन्हा एकदा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानंतर विशेष न्यायालयाने चांडाेळे याला एक दिवसाची ईडी कोठडी सुनावली. सोमवारी न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी ईडीच्या अर्जावर पुनर्विचार करून सोमवारी संध्याकाळपर्यंत अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश विशेष न्यायालयाला दिले.सकाळी उच्च न्यायालयाने निर्देश देताच दुपारी ३ वाजता विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीच्या अर्जावर सुनावणी घेतली. ईडीने आरोपीविरुद्ध इलेक्ट्रॉनिक पुरावे जमा केले आहेत. त्यात मोबाइल, संगणकामधील माहिती, हार्ड डिस्कचा समावेश आहे. पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब पाहता आरोपीचा ताबा ईडीला देणे योग्य आहे, असे विशेष न्यायालयाने म्हटले.ईडीने उच्च न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे की, चांडाेळेचा ताबा वाढवून न देणे, हे कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. ईडीकडे बँकेची मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आहेत. एमएमआरडीएकडून  मिळालेली माहिती आणि कागदपत्रेही आहेत. या सर्व बाबींची चांडोळेकडे चौकशी करायची आहे. हे सर्व आवश्यक असल्याने चांडाेळेचा ताबा वाढवून देण्याची गरज आहे, असा युक्तिवाद सिंग यांनी केला.चांडाेळेचा या घोटाळ्यात सहभाग आहे, हे सिद्ध करणारी कागदपत्रे ईडीकडे नाहीत. सरनाईक यांना लक्ष्य करण्यासाठी त्याला अडकविण्यात येत आहे. ईडीला सरनाईक यांच्या १२ कोटी रुपये इतक्या काळ्या पैशांसंबंधी माहिती मिळाली. याची माहिती चांडाेळे यांना कशी असणार? तो सरनाईक यांचा सीए नाही. चांडाेळे सरनाईक यांचा ‘माणूस’ आहे, हे ऐकीव आहे, असे मर्चंट यांनी न्यायालयाला सांगितले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी निकाल राखून ठेवला होता. सोमवारी उच्च न्यायालयाने या अर्जावर निकाल देत विशेष न्यायालयाला ईडीच्या अर्जावर पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय