शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंग खंडणी प्रकरण:ठाणे न्यायालयाने फेटाळला दोघांचा अटकपूर्व जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 20:27 IST

बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना यांच्याकडे एक कोटींची मागणी करुन त्यांच्याकडून ८० लाखांची खंडणी उकळणाऱ्या अंकित भानुशाली आणि देवेंद्र भानुशाली या दोघांचाही अटकपूर्व जामीनअर्ज ठाणे सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी सोमवारी फेटाळला. मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध करोडोंची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे.

ठळक मुद्देएक कोटींची खंडणी वसूलीकेतन तन्ना यांच्याकडून उकळले ८० लाख रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना यांच्याकडे एक कोटींची मागणी करुन त्यांच्याकडून ८० लाखांची खंडणी उकळणाऱ्या अंकित भानुशाली आणि देवेंद्र भानुशाली या दोघांचाही अटकपूर्व जामीनअर्ज ठाणे सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी सोमवारी फेटाळला. मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध करोडोंची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. याच गुन्हयात अंकित आणि देवेंद्र यांचाही समावेश आहे.अंकित आणि देवेंद्र भानुशाली यांनी निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरुन केतन तन्ना यांच्याकडे एक कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. यातील ८० लाख रुपये तन्ना यांनी दिले होते. मात्र, उर्वरित २० लाख रुपयांसाठी या दोघांनीही तन्ना यांना धमक्या देत त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याच आरोपासंदर्भात अंकित आणि देवेंद्र यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. याच अर्जावरील सुनावणी सोमवारी झाली. त्यावेळी सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी या दोघांवरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांचे अटकपूर्व अर्ज फेटाळले. तन्ना यांच्या वतीने अ‍ॅड. सागर कदम आणि पंकज कवळे यांनी अटकपूर्व जामीन न मिळण्यासाठी बाजू मांडली. तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. व्ही. एस. जाधव यांनी बाजू मांडली. २८ आरोपींपैकी संजय पुनामिया याचा अटकपूर्व अर्ज यापूर्वीच न्यायालयाने फेटाळला आहे. तर प्रदीप शर्मा, विकास दाभाडे आणि सुनिल देसाई या निलंबित पोलीस कॉन्स्टेबलनेही अटकपूर्व जामीनअर्जही यापूर्वीच मागे घेतला आहे. मात्र, या गुन्हयात अद्यापर्यंत ठाणे पोलिसांनी कोणालाही अटक केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी