शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीचे एक कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:09 IST

फुल मार्केटचे गाळे पाण्याखालीच; १४०० व्यापाऱ्यांना पुराच्या पाण्याचा फटका

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एक हजार ४०० व्यापाऱ्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. रविवार आणि सोमवारी बाजारातील कामकाज ठप्प झाल्याने जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. फुल मार्केटचे सर्व गाळे दुसºया दिवशी सोमवारी दुपारपर्यंत पाण्याखालीच होते. त्यामुळे फुल विक्रेत्यांनी बाजार समितीच्या आवाराबाहेर टेम्पोत दुकान थाटून विक्री केली.बाजार समितीच्या बाजूने मोठा नाला वाहतो. अतिवृष्टी झाल्यास तेथून फुल मार्केटमध्ये पाणी शिरते. मात्र, रविवारी बाजार समितीत पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले. त्यामुळे फुलविक्रेत्यांनी बाहेरचा रस्ता धरला. फुल मार्केटमध्ये दररोज १० ते १५ लाख रुपयांची उलाढाल होते. परंतु, रविवारी पावसामुळे बाजार समितीचा कारभार ठप्प होता. फुल मार्केटमधील पाणी दुपारी १२ वाजले तरी ओसरले नव्हते. फुल बाजार हा पहाटे ४ वाजल्यापासून सुरू होतो. पाण्यामुळे फुलविक्रेत्यांनी बाजार समितीच्या आवाराबाहेर रस्त्यावरच टेम्पो, ट्रकमध्ये फुलविक्री केली.२६ जुलै २०१९ रोजी झालेल्या पुराचा फटकाही फुल मार्केटला बसला होता. यावेळी अन्नधान्य, कांदाबटाटे व भाजीपाला दुकानांच्या गाळ्यांनाही मोठा फटका बसला आहे. कांदाबटाटा बाजार आणि भाजीपाला मार्केटमध्ये दररोज प्रत्येकी पाच लाखांची, तर अन्नधान्य बाजारात दररोज ३० लाखांची उलाढाल होते. तर, सर्व बाजारातून दिवसाला किमान ५० लाख रुपयांची उलाढाल होते. परंतु, रविवार व सोमवारी बाजार समितीचे कामकाज ठप्प झाले. त्यामुळे दोन दिवसांत एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी दिली.केडीएमसीमुळे रखडला विकास : महापालिकेने बांधलेले फुल मार्केटचे गाळे मोडकळीस आल्याने या मार्केटच्या विकासासाठी बाजार समितीने महापालिकेच्या नगररचना विभागातून मान्यता मिळवली. बांधकाम आराखड्याला महासभा व तत्कालीन आयुक्तांनी मान्यता दिली. त्यामुळे नवीन इमारतीसाठी निविदा मागवण्यात आली. बांधकाम सुरू होण्याच्या बेतात असताना महापालिका आयुक्तांनी त्याला स्थगिती दिली आहे. परिणामी, फुल मार्केटचा विकास रखडला आहे. दरवर्षी पावसात फुल मार्केटमध्ये पाणी शिरत असल्याने आयुक्तांनी स्थगिती उठवावी. स्थगिती कोणत्या कारणासाठी दिली आहे. त्याचा स्पष्ट उल्लेख व कारण स्पष्ट केले नसल्याचे थळे यांनी सांगितले.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीRainपाऊस