शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी ६६ लाख विद्यार्थ्यांना बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:43 IST

मुद्दा ऑनलाइन शिक्षणाचा; ग्रामीण, दुर्गम भागांतील स्थिती अभ्यासणे आवश्यक

ठाणे : कोरोना प्रादुर्भावामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शाळा नियमित उघडणे अवघड झाले आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने आॅनलाइन अध्यापनाचा पर्याय निवडला आहे. मात्र, या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोन याचा अभाव असल्याने राज्याच्या ग्रामीण भागातील एक कोटी ६६ लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याचा धोका श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी व्यक्त केला आहे.      शासनाने याचा गांभीर्याने विचार करून या आवश्यक बाबी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत पुरवून शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत आणि सक्तीचे शिक्षण तत्त्वाचे पालन होऊ शकेल, असे पंडित यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे. या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासन आॅनलाइन शिक्षणाची पद्धत सुरू करण्याच्या तयारीत आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आणि कोरोना संकटाशी लढण्यासाठी घेतलेला हा आॅनलाइन शिक्षण पद्धतीचा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास पात्र आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. आॅनलाइन शिक्षणप्रणाली हा तंत्रज्ञानाचा भाग असून नेटवर्क व इंटरनेटशी संबंधित आहे. तरी याबाबत महाराष्ट्रातील विशेष करून ग्रामीण व दुर्गम भागातील स्थिती अभ्यासणे आवश्यक ठरेल, असे पंडित यांनी शासनाच्या निदर्शनात आणून दिले आहे.महाराष्ट्रात एक लाख सहा हजार ३२७ प्राथमिक शाळा असून २७ हजार ४४६ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधून दोन कोटी २४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांची संख्या ९९ हजार १४४ (७४.१६ टक्के) इतकी मोठी आहे. तर विद्यार्थी संख्या किमान एक कोटी ६६ लाख (७४ टक्के) इतकी आहे. या भागात विशेषत: दुर्गम आदिवासी क्षेत्रात वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही, हे वास्तव आहे. दुर्गम भागातील चार हजार ९४९ शाळांमध्ये आजही वीज जोडणी झालेली नाही. त्यापैकी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या २७४ आहे. ही आपलीच शासनाची आकडेवारी सांगते असल्याचे त्यांनी राज्य शासनाच्या लक्षात आणून दिले.राज्य शासनाकडे मागण्याराज्यातील एकूण शाळांपैकी ५१ हजार ६७७ (४८.६५ टक्के) शाळांमध्ये संगणक व इंटरनेटची सुविधाच नाही. या विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञानही मिळालेले नाही. त्यांच्यासह आधी शिक्षकांना प्रशिक्षण द्या.  शासनाने राज्यभर आॅनलाइन शिक्षण पद्धती अमलात आणण्याआधी ग्रामीण व दुर्गम भागात तत्काळ विद्यार्थ्यांना आॅनलाइन शालेय अभ्यास करण्यासाठी प्रत्येक गावपाड्यात वीजजोडणी व वीजपुरवठा सुरळीत करावा, मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध करावी. प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला लॅपटॉप, टॅब किंवा अण्ड्रॉइड मोबाइल द्यावेत. तसेच यासाठी लागणारा इंटरनेटचा पुरेसा डेटा मोफत द्यावा .