शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील एका आरोपीचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 21:23 IST

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयातील सुनिल देसाई या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने ठाणे न्यायालयात जामीनासाठी सोमवारी अर्ज केला.

ठळक मुद्दे ९ आॅगस्टला होणार सुनावणीआरोपींना मोक्का लावण्याची फिर्यादींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयातील सुनिल देसाई या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने ठाणे न्यायालयात जामीनासाठी सोमवारी अर्ज केला. याच अर्जाची सुनावणी येत्या ९ आॅगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, परमबीर यांच्यासह सर्वच आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईची मागणी पोलिसांकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना आणि साक्षीदार क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, तत्कालीन पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आणि निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्यासह २८ जणांविरुद्ध खंडणी उकळल्याची तक्रार दाखल केली आहे. मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करुन त्यातून सुटकेसाठी आणि पोलिसांचा मार वाचविण्यासाठी एक कोटी १८ लाखांची मागणी करुन तत्कालीन निरीक्षक शर्मा यांनी ते स्वीकारल्याचा आरोप केतन यांनी केला आहे.या प्रकरणातील विकास दाभाडे आणि सुनील देसाई या दोन कथित आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी २ आॅगस्ट रोजी अर्ज केला. मात्र, दाभाडे याने काही वेळातच आपला अटकपूर्व अर्ज परत घेतला. तर देसाई यांच्या अर्जावर न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. या अर्जावर पोलिसांचे म्हणणे मागविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेत आरोपी असलेल्या आठ पोलीस अधिकाऱ्यांसह २८ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी सह पोलीस आयुक्तांकडे केली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. सागर कदम यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी