शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिन्हासाठी ओमी टीम छोट्या पक्षाच्या शोधात

By admin | Updated: February 2, 2017 02:59 IST

भाजपाने ओमी कलानी यांच्याशी आघाडी केली असल्याचे वरकरणी भासवले जात असले, तरी कलानी व त्यांच्या उमेदवारांनी ‘कमळ’ या भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी,

- सदानंद नाईक,  उल्हासनगरभाजपाने ओमी कलानी यांच्याशी आघाडी केली असल्याचे वरकरणी भासवले जात असले, तरी कलानी व त्यांच्या उमेदवारांनी ‘कमळ’ या भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, याकरिता भाजपाचे नेते प्रयत्न करीत आहेत. खुद्द कलानी यांना आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यात रस आहे. त्यामुळे एखाद्या नोंदणीकृत पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याच्या विचारात कलानी आहेत.भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात राजकारणाचा गुन्हेगारीकरणाचा मुद्दा १९९० च्या दशकात तापवला होता. त्या वेळी मुंडे यांचे लक्ष्य पप्पू कलानी यांची उल्हासनगरातील झुंडशाही हे होते. मात्र, आता भाजपाने त्याच कलानी यांच्याशी आघाडी केली आहे. इतकेच नव्हे, तर उल्हासनगरात शिवसेनेला चारीमुंड्या चीत करण्याकरिता कलानी व त्यांच्या समर्थकांनी ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, याकरिता भाजपाचे नेते दबाव टाकत आहेत.कलानी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ होते. आता ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवणे, याचा अर्थ स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व पुसून टाकण्यासारखे आहे, हे कलानी यांनी हेरले आहे. मात्र, सर्व उमेदवारांना एकसमान चिन्ह हवे असल्यास कमळ छातीशी कवटाळणे किंवा एखाद्या नोंदणीकृत छोट्या पक्षात प्रवेश करून त्याचे चिन्ह घेणे, हाच पर्याय कलानी यांच्यापुढे आहे.पप्पू यांचे कट्टर समर्थक व मानसपुत्र जीवन इदनानी, साई बलराम, किशोर वनवारी, विनोद ठाकूर, सुरेश जाधव आदींनी त्यांच्यापासून फारकत घेऊन गंगाजल फ्रंट नावाची संघटना स्थापन केली. मात्र, निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना एकच चिन्ह मिळणार नसल्याने त्यांनी ऐन वेळेवर शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या ‘लोकभारती’ पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या. ‘लोकभारती’चे सन २००७ च्या पालिका निवडणुकीत तब्बल १४ नगरसेवक निवडून आले होते. त्यांनी शिवसेना-भाजपासोबत युती करून महापौरपद पटकावले होते. तसेच २०१२ च्या निवडणुकीपूर्वी इदनानी यांनी स्वत:चा साई पक्ष स्थापन केला. पक्षाचे ९ नगरसेवक निवडून आल्यावर पुन्हा शिवसेना-भाजपासोबत युती करून महापौरपद मिळवले होते. आता ओमी कलानी यांनाही अशाच एखाद्या छोट्या नोंदणीकृत पक्षाचा आधार घ्यावा लागेल किंवा मग भाजपाचे ‘कमळ’ हाती घ्यावे लागेल. ‘कमळ’ चिन्हावर लढणार नाही : भाजपाच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार नाही. आमच्या टीमचे उमेदवार स्वतंत्र उभे राहणार असून सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळण्यासाठी राजकीय तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. नोंदणीकृत लहान पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा विचार केला जाऊ शकतो. - ओमी कलानी