शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

व्हिप डावलल्याने ओमी-भाजप आमने-सामने; समर्थक नगरसेवकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:52 IST

नोटिसा मिळाल्याने कलानी समर्थक नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली. नगरसेवकांना शांत राहण्याचे आवाहन करून एकाचेही पद जाणार नसल्याचे ओमी कलानी यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

सदानंद नाईक उल्हासनगर : महापौर निवडणुकीत पक्षाचा व्हिप डावलणाऱ्या ओमी टीम समर्थक नऊ नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांनी नोटिसा दिल्यानंतर भाजप आणि ओमी टीम आमने-सामने उभे ठाकले आहेत. ओमी समर्थक नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर शहरातून कलानीराज संपुष्टात येईल, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी या पार्श्वभूमीवर केला आहे.

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असताना महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई अशान निवडून आल्या. भाजपमधील ओमी समर्थक नऊ नगरसेवकांनी पक्षाचा व्हिप डावलून मतदान केल्याने, त्यांच्याविरोधात पक्षाचे गटनेते जमनू पुरस्वानी यांनी कोकण विभागीय आयुक्ताकडे धाव घेऊन त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका दाखल केली. दरम्यान, जमनू पुरस्वानी यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर, विभागीय आयुक्तांनी नऊ नगरसेवकांना नोटिसा पाठवून २४ जानेवारी रोजी सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले. व्हिप डावलणाºया नऊ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा दावा पुरस्वानी यांनी पत्रकार परिषदेत केला.

नोटिसा मिळाल्याने कलानी समर्थक नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली. नगरसेवकांना शांत राहण्याचे आवाहन करून एकाचेही पद जाणार नसल्याचे ओमी कलानी यांनी यावेळी ठणकावून सांगितले. ओमी टीमचे प्रवक्ते कमलेश निकम म्हणाले की, आमच्या नगरसेवकांची चिंता भाजपने करण्याची गरज नाही. मात्र, ज्या वॉर्डातून पुरस्वानी निवडून आले आहेत, तेथून ते पुन्हा निवडून येणार नसल्याचा दावा त्यांनी केला. कमलेश निकम आणि जमनू पुरस्वानी हे एकमेकांसमोर उभे ठाकले असून, दोघांतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.भाजप विरुद्ध कलानी वाद रंगण्याची चिन्हेउल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून कुमार आयलानी निवडून आल्यावर त्यांचा सर्वसामान्य नागरिकांसोबत असलेला संवाद तुटल्याचा आरोप होत आहे. त्यापाठोपाठ पालिका हातून गेल्याने भाजपकडे असलेला कार्यकर्त्यांचा ओघ कमी होत गेल्याचे बोलले जात आहे. एकूणच नजीकच्या काळात भाजपविरुद्ध कलानी असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपा