शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

पॅकेजवरून ओमी टीम, साईचे भाजपा नेत्यांसोबत खटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:09 IST

कल्याण-डोंबिवलीच्या पॅकेजप्रमाणेच उल्हासनगरचे पॅकेजही निवडणुकीनंतर हवेत विरले का, असा प्रश्न ओमी टीमसह साई पक्षाने विचारल्याने भाजपाच्या आघाडीतील असंतोषाला तोंड फुटले आहे.

उल्हासनगर : कल्याण-डोंबिवलीच्या पॅकेजप्रमाणेच उल्हासनगरचे पॅकेजही निवडणुकीनंतर हवेत विरले का, असा प्रश्न ओमी टीमसह साई पक्षाने विचारल्याने भाजपाच्या आघाडीतील असंतोषाला तोंड फुटले आहे. भाजपाच्याही काही नगरसेवकांनी त्यांच्या सूरात सूर मिसळल्याने स्तताधारी पक्षातच सारे आलबेल नसल्याचे चित्र उभे राहिले आहे. उल्हासनगरच्या विकास आराखड्याबद्दलही कोणी तोंड उघडण्यास तयार नसल्याने सत्ताधाºयांत अस्वस्थता आहे.महापालिकेवर भाजपाची सत्ता येऊन सहा महिने झाले. पण शहर विकास आराखडा, मोठ्या योजनेसह विशेष पॅकेज दिले नाही. उल्हासनगर महापालिका स्वबळावर ताब्यात घेण्यासाठी थेट ओमी टीमला भाजपामध्ये घेतले. ओमी टीमच्या सर्व समर्थकांना भाजपाच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरूनही स्वबळावर येण्यासाठी संख्याबळ कमी पडले. अखेर भाजपाने साई पक्षाचा पाठिंबा घेऊन त्यांना महत्वाचे पदे दिली. महापौरपद भाजपाकडे तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती पद साई पक्षाकडे गेले. ओमी टीमला महत्वाचे पदे न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी वाढली आहे. सव्वा वर्षांनी महापौरपद ओमी टीमला देण्याचे आश्वासन दिले आहे.महापालिका निवडणुकीच्यावेळी भाजपाने शहर विकासासाठी विशेष पॅकेजचे आश्वासन दिले होते. शहरविकास आराखडा १५ दिवसात मंजूर करणे, नगररचनाकाराची नियुक्ती तसेच विशेष निधी देण्याचे मान्य केले होते.भाजपाचा महापौर बसून सहा महिन्याचा कालावधी होऊनही सरकारने शहरासाठी कोणतीही आकर्षक योजना जाहीर केलेली नाही.शहर विकास आराखडयाला मंजुरी नाही. मोठ्या योजनेला मान्यता नाही किंवा विशेष पॅकेज नाही. त्यामुळे अंतर्गत धुसफूस वाढली आहे. भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी हे महापौर मीना आयलानींसोबत मुख्यमंत्र्यांना भेटून शहर विकासाबाबत निवेदन देतात. मात्र आश्वासनापलिकडे मुख्यमंत्री काहीएक देत नसल्याने भाजपाच्या नगरसेवकांसह ओमी टीम व साई पक्षातील नगरसेवकांमध्ये असंतोष वाढला आहे.