शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर तालुक्यात ठिबक, मर्चिंग पद्धतीने भेंडीचे उत्पादन; तुते गावातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 01:17 IST

थेट रोपालाच पाणी मिळत असल्याने झपाट्याने होते वाढ

भातसानगर : शहापूर तालुक्यात तुते या गावातील शेतकऱ्याने आपल्या शेतीत ठिबक पद्धतीबरोबरच मर्चिंग पद्धतीने भेंडी उत्पादन घेण्यास दीड महिन्यापासून सुरुवात केली आहे. यामधून आपल्याला अधिक फायदा झाल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. 

आज बदलत्या हवामानाचा जसा मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे तसाच तो शेतीवरही झाला असून, याचा परिणाम म्हणजे आज बियाणे कुजणे, रोपांची आवश्यक वाढ न होणे, रोपांवर बुरशी येणे, उत्पादन घटणे, रोपे जळून जाणे यामुळे उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, तरीही शेतकरी आपल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत. तुते येथील शेतकऱ्याने आपल्या शेतीत केलेला यशस्वी प्रयोग निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या गावातून सर्वाधिक भेंडी ही परदेशात जाते. या भेंडीचे उत्पादन घेत असताना तिला सहा ते सात दिवसांतून सरी पद्धतीने भरपूर पाणी दिले जाते, त्यामुळे अधिक प्रमाणात पाणी हे उन्हाने तापून वाफेत रूपांतर होऊन जाते. 

काही प्रमाणात पाणी पुढे जाताना जमिनीतच सुकून जाते. फार थोडे पाणी हे त्या रोपाला मिळते. तर अधिक पाणी फुकट जाते. मात्र तुते गावातील विनोद पांढरे यांनी एक एकर शेतीत भेंडीची लागवड केली असून ठिबक व मर्चिंग पद्धतीचा वापर केल्याने पाण्याचा अपव्यय होत नाही. रोपालाच पाणी मिळत असल्याने रोपाची वाढ झपाट्याने होऊन अधिक पीक येते. गवत येत नसल्याने मजुरीही वाचते.  आज या शेतकऱ्याने गेल्या दोन महिन्यांत आपल्या झालेल्या खर्चासह लाख रुपयांपर्यंत नफा मिळविला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने इतरांनी उत्पन्न घेतल्यास फायदा होईल, असे त्यांचे मत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी