आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून होतेय टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 01:37 AM2019-09-30T01:37:43+5:302019-09-30T01:39:16+5:30

विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून सामाजिक कार्यकर्ते व जागरुक नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी निवडणूक आयोगाच्या सीव्हिजील अ‍ॅपसह आयोगाच्या ईमेलवर चालवल्या आहेत.

Officials are taking action to breach the Code of Conduct | आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून होतेय टोलवाटोलवी

आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून होतेय टोलवाटोलवी

Next

मीरा रोड : भार्इंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर भररस्त्यात भाजपची प्रसिध्दी करणारे वाहन बेकायदेशीरपणे वापरले जात असताना, त्यावर कारवाई करण्यासाठी आचारसंहितेच्या भरारी पथकासह मीरा भार्इंदर विधानसभा मतदारसंघ व ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे अधिकारी एकेमेकांकडे बोटं दाखवून गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ करत आहेत.

विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून सामाजिक कार्यकर्ते व जागरुक नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी निवडणूक आयोगाच्या सीव्हिजील अ‍ॅपसह आयोगाच्या ईमेलवर चालवल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे संबंधित अधिकारी, आचारसंहिता पथकासह विधानसभा मतदारसंघासाठी नेमलेले अधिकारी कार्यवाही करत नसल्याने किंवा दिशाभूल करणारा अहवाल पाठवत असल्याने आरोपांच्या फेºयात सापडले आहेत. याचा एक नमुना भार्इंदर पूर्वेला भाजपने उभ्या केलेल्या प्रचाराच्या एका गाडीवरुन पुन्हा अनुभवायला मिळाला. पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर साईबाबा रुग्णालयासमोर एक गाडी भाजपच्या प्रचाराचे स्टीकर लावून सजवून उभी करण्यात आली.

या गाडीवर भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांची छायाचित्रे, तसेच पक्षाचा झेंडाही लावण्यात आला आहे. हा रस्ता वर्दळीचा असून, या मार्गाने मीरा भार्इंदर विधानसभा व ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील नागरीक, मतदार मोठ्या संख्येने येजा करत असतात.

याबाबत आचार संहितेच्या भरारी पथकाच्या प्रमुख तथा पालिकेच्या प्रभाग अधिकारी दिपाली पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली. आयोगाच्या ईमेल व सीव्हिजील अ‍ॅपवरदेखील तक्रारी करुन तक्रारदारांनी गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. मात्र दिपाली पवार यांनी ही गाडी त्यांच्या मतदारसंघात उभी असली तरी, त्यावरील छायाचित्रातील स्थानिक नेते मीरा भार्इंदर विधानसभा मतदारसंघातील असल्याचे कारण पुढे करुन तेथील अधिकाराऱ्यांकडे कारवाईसाठी ढकलले. इतकेच नाही तर, या गाडीच्या दावेदाराकडे विचारणा केली असता त्याने परवानगीसाठी अर्ज केल्याचेही पवार म्हणाल्या.

परवानगी नसताना प्रचार चालवल्याने गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना अधिका-यांनी याप्रकरणी कारवाई टाळली. मीरा-भार्इंदरमधील संबंधित अधिकाºयांनी ही गाडी ओवळा-माजिवडा मतदारसंघात असल्याचे कारण सांगून त्यांनी कारवाई केली नाही.

या प्रकरणातील एक तक्रारदार कृष्णा गुप्ता यांनी भरारी पथक, आचारसंहिता पथकासह दोन्ही विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक अधिकारी हे आचारसंहितेचे उल्लंघन करणाºयांना ‘आदर्श’ संरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे. आपण आधीपासून आयोगासह शासनाकडेही तक्रारी केल्या होत्या की, पालिका आयुक्त व अधिकारी वर्ग हे आचारसंहितेचे उल्लंघन करण्यास मोकळे रान देतील. याप्रकरणी बेजबाबदार अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करुन आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत भरारी पथकाच्या दिपाली पवार म्हणाल्या की, गाडी आमच्या हदद्दीत असली तरी त्यावरील उमेदवार हे मीरा भार्इंदर मतदारसंघातील असल्याने प्रकरण त्यांच्याकडे वर्ग केले आहे. या गाडीची आम्ही पाहणी करुन विचारणा केली असता, त्याच्याकडे परवानगी नव्हती, हे मात्र पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Officials are taking action to breach the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.