ठाणे लाेकसभेच्या ओवळा माजिवडातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हाताळले ईव्हीएम यंत्र

By सुरेश लोखंडे | Published: April 5, 2024 05:01 PM2024-04-05T17:01:03+5:302024-04-05T17:02:38+5:30

ठाणे लोकसभा मतदारसंघाकरिता २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Officials and employees of Owla Majiwad of Thane Lok Sabha handled the EVM machine. | ठाणे लाेकसभेच्या ओवळा माजिवडातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हाताळले ईव्हीएम यंत्र

ठाणे लाेकसभेच्या ओवळा माजिवडातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हाताळले ईव्हीएम यंत्र

ठाणे : या ठाणे लोकसभा मतदारसंघांतील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पोखरण रोड नं. २ येथे मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देऊन त्यांची आज बैठक पार पडली.            

ठाणे जिल्हाधिकारी ठाणे तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांच्या निर्देशानुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. शितल देशमुख, यांच्या नियंत्रणाखाली हे मतदान यंत्र हाताळीचे प्रशिक्षण अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.आशिषकुमार बिरादार यांनी नोडल अधिकारी हनमंत यमेलवाड यांच्या उपस्थितीत घेतले.

ठाणे लोकसभा मतदारसंघाकरिता २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, विविध सरकारी, निमसरकारी आस्थापनांमधून कर्मचारी या निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आले आहेत. या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना यावेळी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक आयोगाकडून प्राप्त निर्देशांबाबत सर्वांना माहिती देण्यात आली व मतदानयंत्र माहिती पुस्तिका उपलब्ध करुन देण्यात आल्या.

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रथम प्रशिक्षणासाठी ईव्हीएम मशीन तयार करण्यात आल्या. प्रथम प्रशिक्षणाच्या दिवशी ईव्हीएम प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी २४ वर्ग कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी मतदान कक्षावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना क्षेत्रिय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा पुरविण्यात आलेली आहे,
 

Web Title: Officials and employees of Owla Majiwad of Thane Lok Sabha handled the EVM machine.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.