शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘कोकणकन्ये’तील महिलेची ‘वनरुपी’मध्ये प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:39 IST

ठाणे स्थानकातील घटना, उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात केले दाखल; बाळ-बाळंतीण सुखरूप

ठाणे : कणकवलीहून कोकणकन्या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या पूजा मुन्ना चौहान (२०) या महिलेला कोकणकन्या एक्स्प्रेसच्या शौचालयातच प्रसववेदना होऊ लागल्याने सुदैवाने गाडी ठाणेरेल्वेस्थानकात लागल्यावर येथील प्रथमोपचार केंद्रामधील (वनरुपी क्लिनिक) डॉक्टर ओमकार आणि पारिचारिका पूजा यांनी रेल्वे प्रशासनाच्या मदतीने तातडीने क्लिनिकमधून आणून शनिवारी सकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास तिची सुखरूप प्रसूती केली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला असून बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे रेल्वे प्रशासन आणि तेथील डॉक्टरांनी सांगितले.चौहान दाम्पत्य हे दोन मुलांसह शुक्रवारी कणकवलीहून मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथे निघाले होते. त्यासाठी ते कोकणकन्या एक्स्प्रेसमधून ठाण्यात उतरून त्यानंतर ठाण्यातून बुऱ्हाणपुरला जाणाºया गाडीने प्रवास करणार होते. दरम्यान, सकाळीच ठाणे रेल्वेस्थानक येण्यापूर्वीच तिला प्रसववेदना सुरू झाल्या. यावेळी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाºया सहप्रवाशांनी याबाबत रेल्वे कंट्रोलला माहिती दिली. रेल्वे कंट्रोलकडून ठाणे रेल्वेस्थानक प्रबंधक कार्यालयाला कळवले. माहिती मिळताच ठाणे रेल्वे उपस्टेशन प्रबंधक पी.के. प्रधान यांनी क्लिनिकमधील डॉक्टरांना माहिती देऊन तेथील स्टाफ घेऊन गाडी येणाºया फलाटाकडे धाव घेतली. गाडी स्थानकात लागताच या महिलेची तपासणी केली असता प्रसूतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. यामुळे तिला तातडीने स्ट्रेचरवरून क्लिनिकमध्ये आणून तिची त्यानंतर डॉक्टरांनी सुखरूप प्रसूती केली. त्यानंतर, पुढील उपचारार्थ त्या मायलेकीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवल्याची माहिती रेल्वे आणि डॉक्टरांनी दिली.अशा प्रकारे या प्रथमोपचार केंद्रातील एप्रिल या महिन्यातील दुसरी, तर प्रथमोपचार सुरू झाल्यानंतरची चौथी आणि मुंबईमधील सातवी नॉर्मल प्रसूती असल्याची माहिती क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे