शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या रुग्णांमुळे बेड होऊ लागले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

ठाणे : ठाणे मनपा हद्दीत काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या चार ते पाचपटीने वाढत आहे. त्यामुळे मनपा हद्दीतील कोविड ...

ठाणे : ठाणे मनपा हद्दीत काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या चार ते पाचपटीने वाढत आहे. त्यामुळे मनपा हद्दीतील कोविड सेंटरमधील बेडची संख्याही कमी होत आहे. मनपा हद्दीत सध्या सहा हजार १२७ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून त्यातील बहुसंख्य रुग्ण हे घरी उपचार घेत असल्याने रुग्णालयातील एक हजार ३५० बेड फुल झाले आहेत. तर सध्या एक हजार २७४ बेड शिल्लक आहेत. त्यातील ६०० बेड हे भाईंदरपाडा येथील विलगीकरण कक्षातील आहेत, तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांतील बेड मात्र फुल होऊ लागले आहेत.

रुग्ण वाढत असल्याने मनपाने ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सध्या दररोज ७०० ते ८०० रुग्ण आढळत आहेत. सध्या प्रत्यक्षात सहा हजार १२७ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. यातील एक हजार ३५० रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यामुळे दोन हजार ६०२ बेडपैकी एक हजार २७४ बेड आजही रिकामे असल्याचा दावा मनपाने केला आहे; परंतु दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालयांतील तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील बेडही आता रिकामे नसल्याची माहिती पुढे आली आहे. मनपाच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये विलगीकरणाचे २२१, ऑक्सिजनचे १३, आयसीयूचे ७७ आणि व्हेंटिलेटरचे १०० बेड शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली.

१६ खासगी रुग्णालयांत एकूण ९१० बेड असून त्यातील ३४१ बेड सध्या शिल्लक आहेत. उर्वरित ५६९ बेड फुल झाले आहेत. त्यातही शहरातील काही नामांकित खासगी रुग्णालयात बेडही शिल्लक नाहीत. त्यामुळे येथे उपचारासाठी रुग्ण वेटिंगवर असल्याची माहितीही मनपा सूत्रांनी दिली. या शिल्लक बेडमध्ये विलगीकरणाचे ८४, ऑक्सिजनचे २५७, आयसीयूचे ६१ आणि व्हेंटिलेटरचे २१ बेड शिल्लक असल्याची माहिती मनपाने दिली.

...तर तीन ते चार दिवसांत बेड फुल

कोरोनाबाधितांपैकी घरी उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण हे जास्त असल्याने रुग्णालयात सध्या काही प्रमाणात बेड शिल्लक असल्याचे दिसत आहे; परंतु रुग्णवाढीचा हा दर असाच राहिला तर तीन ते चार दिवसांत बेड फुल होतील, असे दिसत आहे.

विलगीकरण कक्षात ६०० बेड

ठामपाने भाईंदर पाडा येथे विलगीकरण केंद्र पुन्हा सुरू केले आहे. तेथे लक्षणे नसलेल्यांना ठेवले जात आहे. त्यानुसार येथील ६७५ पैकी ७५ बेड फुल झाले असून ६०० बेड शिल्लक असल्याची माहिती मनपाने दिली.

---------------------------