शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

ठाणे जिल्ह्यातील एचआयव्ही रुग्णांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:37 IST

ठाणे जिल्ह्यात एचआयव्हीबाधित रुग्ण, गर्भवतींची संख्या घटल्याचा दावा ठाणे जिल्हा सरकारी रुग्णालय आणि आरोग्य विभागाने केला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात एचआयव्हीबाधित रुग्ण, गर्भवतींची संख्या घटल्याचा दावा ठाणे जिल्हा सरकारी रुग्णालय आणि आरोग्य विभागाने केला आहे. सामान्य (स्त्री-पुरुष) रुग्णांच्या तपासणीत यंदा हे प्रमाण ०.९० टक्क्यांवर, तर गर्भवती रुग्णांचे प्रमाण ०.०६ टक्क्यांवर आले आहे. एड्स प्रतिबंधात्मक जिल्हा आरोग्य विभागामार्फत राबवलेल्या जनजागृतीचे हे फलित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.२००७ ते आॅक्टोबर २०१८ या वर्षात जिल्ह्यात ३४ हजार ६२४ एचआयव्हीबाधित रुग्णांची नोंद आहे. २१ हजार ४१९ बाधितांवर एआरटी केंद्रात औषधोपचार सुरू आहेत. या कालावधीत तीन हजार ५९८ स्त्री-पुरुषांचा तर १२५ बालकांचा मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारीत दिसत आहे.‘आपली एचआयव्हीची स्थिती माहिती आहे का?’ असे यंदाच्या जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य आहे. तसेच ‘मोफत तपासणी व मोफत उपचार’ यावर यंदा लक्ष केंद्रित केले आहे. वि.सा. सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा एड्स कार्यक्रम नियंत्रण विभागांतर्गत येणाऱ्या आयसीटीसी केंद्रात एप्रिल २०१० ते आॅक्टोबर २०१९ दरम्यान १४ लाख ९१ हजार ११५ जणांच्या चाचणीत २८ हजार २४३ जण एचआयव्हीबाधित रुग्ण आढळले आहेत.२०१७-१८ मध्ये दोन हजार १७९ बाधित रुग्ण आढळून आले. तर, यंदा एक हजार २१५ रुग्ण आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१० ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान नऊ लाख ३२ हजार ८६८ गर्भवतींची चाचणी केली आहे. त्यामध्ये एक हजार ४६५ गर्भवती बाधित असल्याचे समोर आले आहे. तर, एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान एक लाख १३ हजार ३० गर्भवतींची तपासणी केली होती. त्यात ११७ जणी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले होते. एप्रिल २०१८ ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान ६८ हजार ८३६ गर्भवतींची तपासणी केली होती. त्यामध्ये ४५ माता पॉझिटिव्ह आढळून आल्या.>पंधरा दिवस जनजागृतीजागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात १ ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यान विविध स्तरांवर जगजागृती करण्यात येत आहे. यामध्ये प्रभातफेरीसह चित्रकला, पथनाट्य आदी स्पर्धा होणार आहेत.अतिजोखीम असणारे गट व सर्वसामान्य लोकांपर्यंत विविध संस्था, संघटना व सरकारी यंत्रणेमार्फत राबवल्या जाणाºया जनजागृतीमुळे एचआयव्हीचा प्रसार जिल्ह्यात रोखण्यास यश आले आहे.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

टॅग्स :HIV-AIDSएड्स