शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात नऊवर्षीय मुलगी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 05:11 IST

साईनाथनगर परिसरात खेळत असलेल्या नऊवर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मुस्कान अन्वर शेख (९) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला नऊ टाके पडले असून डोळा थोडक्यात बचावला आहे.

ठाणे : साईनाथनगर परिसरात खेळत असलेल्या नऊवर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मुस्कान अन्वर शेख (९) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला नऊ टाके पडले असून डोळा थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मुस्कान अन्वर शेख ही वर्तकनगर येथील साईनाथनगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत असून माजिवडा येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रविवारी दुपारी ती घराजवळील परिसरात दोन ते तीन मित्रांसोबत खेळत होती. ती खेळण्यात गुंग असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामुळे मुस्कान खाली पडली आणि त्यानंतर कुत्र्याने तिच्या डोक्याजवळ चावा घेतला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या मुस्कानच्या दोन ते तीन मित्रांनी लगेचच तिथून पळ काढला. त्यामुळे ते कुत्र्यांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.या घटनेनंतर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात मुस्कानला उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तिच्या डोळ्याजवळ जखम असल्यामुळे तिला मुंबईच्या जे.जे. रु ग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत तिच्या डोळ्याला इजा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डोळ्याजवळील जखमेमुळे तिला अजूनही डोळा उघडता आलेला नाही. मात्र, उपचारानंतर डॉक्टरांनी तिला आता घरी सोडले आहे. भटक्या कुत्र्यांची या परिसरात दहशत असून, महानगरपालिकेने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टॅग्स :dogकुत्रा