शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता आम्हालाही केडीएमसीत असुरक्षित वाटते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 00:22 IST

केडीएमसीच्या लिपिकाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याने महापालिकेची बदनामी झाली आहे.

कल्याण : केडीएमसीच्या लिपिकाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याने महापालिकेची बदनामी झाली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद शनिवारच्या स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. या प्रकारामुळे आम्हालाही असुरक्षित वाटत असल्याची भावना नगरसेविकांनी व्यक्त करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.मालमत्ताकर भरण्याची मुदत वाढवून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी कर विभागातील लिपिक रमेशचंद्र राजपूत याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. शिवसेना सदस्य वामन म्हात्रे म्हणाले, ‘महापालिकेची प्रतिमा यापूर्वी भ्रष्ट होती. मात्र, भ्रष्टाचाराचा वेगळाच प्रकार महापालिकेत राजपूत यांच्या प्रकरणानंतर उघड झाला आहे. त्यामुळे महापालिकेची प्रचंड बदनामी झाली आहे.’ तर, सदस्य कस्तुरी देसाई म्हणाल्या, या प्रकारामुळे आम्हा नगरसेविकांनाही असुरक्षित वाटत आहे. नागरिकांच्या समस्या व विविध विकासकामांसाठी आम्ही विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांकडे जात असतो. या प्रकरणानंतर आम्ही अधिकाऱ्यांकडे कामानिमित्त जायचे की नाही, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे. आम्हाला काहीच सुरक्षितता नसते. त्यामुळे अशा प्रकारची हिंमत यापुढे कुठलाही अधिकारी करणार नाही, हे सांगता येत नाही. यासाठी राजपूत प्रकरणात कठोर कारवाई केली जाणे अपेक्षित आहे, अशी मागणी त्यांनी केली.सदस्य शालिनी वायले म्हणाल्या, ‘आम्हाला महिला सुरक्षारक्षक पुरवा. एखाद्या महिलेशी असे वर्तन करण्याची एका लिपिकाची कशी काय हिंमत होते? वरिष्ठांचा त्यावर काहीच वचक नाही. राजपूतविरोधात कठोर कारवाई करावी झालीच पाहिजे.’शिवसेना सदस्य प्रियंका भोईर यांनी हा प्रकार निषेधार्ह आहे. राजपूतला निलंबित न करता त्याला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. सदस्यांच्या भावना तीव्र आणि संतापजनक आहे. त्यांच्या भावनांशी समिती सहमत असल्याचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.>अहवालानंतर कारवाईराजपूत याला या प्रकरणात केवळ निलंबित न करता त्याला महापालिकासेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असे आदेश उपायुक्त मिलिंद धाट यांना दिले आहेत. उपायुक्त धाट यांनी राजपूत याच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. समितीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवून पुढील कार्यवाही केली जाईल. त्यानुसार, कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका