शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आता गुन्हेगार सुटणार नाही, तर अडकणार; दोष सिद्धीचा ठाणे पॅटर्न राज्यभर राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 05:26 IST

गुन्ह्यांची कबुली न दिल्यामुळे आरोपींनाही न्यायालयीन प्रक्रियेसाठी तसेच जामिनासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत होता.

- जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वर्षानुवर्षे चालणारे गुन्हे, आरोपीच न मिळाल्यामुळे त्यांच्यावरील दोष सिद्ध होण्याच्या प्रमाण घटले होते. मात्र, अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात आयोजित शिबिरात हे चित्र ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समुपदेशनामुळे बदलले. अवैध मद्यविक्री व निर्मितीच्या ५३ गुन्ह्यांमध्ये ५५ आरोपींवर कारवाई झाली. त्यामुळे ठाण्याचा हाच पॅटर्न आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राज्यभर राबविला जाणार असल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डॉ. नीलेश सांगडे यांनी बुधवारी दिली.

गुन्ह्यांची कबुली न दिल्यामुळे आरोपींनाही न्यायालयीन प्रक्रियेसाठी तसेच जामिनासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. अशा अनेक बाबींचे ठाण्याचे अधीक्षक डॉ. सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ निरीक्षक व २४ उपनिरीक्षक यांनी आरोपी तसेच त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले. 

अधिकाऱ्यांनी डोळ्यांत अंजन घातल्यामुळे आरोपींनीही  गुन्हा कबूल केला. आराेपींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड झाल्याने एकाच दिवसात १४ लाख २५ हजारांचा दंड शासनाकडे जमा झाला. ठाणे पॅटर्नची उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दखल घेतली. ठाण्याचा हा पॅटर्न आता राज्यभर राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

अवैध मद्यविक्री, निर्मितीमधील गुन्हेगारांना पकडताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. आरोपींना पकडूनही अनेक वेळा ते गुन्ह्यांची कबुली देत नव्हते. या गुन्ह्यात तीन ते पाच वर्षांची शिक्षा किंवा २५ हजारांचा दंडाच्या शिक्षेबाबत समुपदेशन केले. दारूबंदीच्या गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढवले तर आरोपींवर जरब राहील. अवैध मद्यविक्री, निर्मितीला आळा बसेल.- डॉ. नीलेश सांगडे, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी