शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता शिवसेना सत्तेपुढे लाचार : संदीप देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 01:27 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मनसेला नितांत आदर आहे.

डोंबिवली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मनसेला नितांत आदर आहे. बाळासाहेबांच्या आयुष्यावरील चित्रपट निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित करून शिवसेना त्यांच्या नावावर मते मागू इच्छित आहे. पण, या चित्रपटामुळे सध्याच्या शिवसेनेची पोलखोल होईल. बाळासाहेब हे आक्रमक आणि स्वाभिमानी होते, तर आताची शिवसेना सत्तेसाठी किती लाचार आहे, हा फरक यातून उघड होईल, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली.शहराच्या पूर्व भागात आदित्य मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी वज्र निर्धार मेळावा झाला. त्यावेळी देशपांडे बोलत होते. या मेळाव्यास मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, महिला आघाडीच्या मंदा पाटील, राहुल कामत, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, सुदेश चुडनाईक, प्रल्हाद म्हात्रे आणि हर्षद पाटील आदी उपस्थित होते. देशपांडे म्हणाले की, मनसे कार्यकर्त्यांनी केवळ सोशल मीडियावर रिअ‍ॅक्ट व पोस्ट टाकण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन त्याठिकाणी काम करावे. महिला व तरुणांनी प्रत्येक घरातून जाऊन मनसेचे काम सांगितले पाहिजे. २०१० मध्ये डोंबिवली-कल्याणमधून २८ नगरसेवक निवडून आले होते. डोंबिवलीतून २० नगरसेवक निवडून आले होेते. या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांत कामे केली. त्याचा प्रचार करण्यात कार्यकर्ते कमी पडले. त्यामुळे पक्षाला २०१५ च्या निवडणुकीत फटका बसला. तेच काम जोमाने करायचे आहे, असे आवाहन देशपांडे यांनी कार्यकर्त्यांना केले.अभ्यंकर म्हणाले की, २०१४ मध्ये मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. नाशिक महापालिका हद्दीत मनसेने कामे केली. त्याचा अपप्रचार विरोधकांंनी केला. निवडणुकीत भाजपा सरकारने केलेल्या चुकीच्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. मनसेच्या शहराध्यक्षपदावरून दूर केलेले मनोज घरत हे मेळाव्यास उपस्थित नव्हते. ते कामानिमित्त पुण्याला गेल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे नेते राजू पाटील हेही अनुपस्थित होते.>शहराध्यक्षांचे कौतुकमनसेचे प्रदेश उपाध्यक्ष कदम यांच्याकडे पुन्हा शहराध्यक्षपदाची धुरा पक्षाने दिली आहे. कदम पुन्हा सत्ताधाऱ्यांविरोधात आगळीवेगळी आंदोलने करत आहेत. त्यांचे कौतुक अभ्यंकर आणि देशपांडे यांनी केले. कदम यांच्यासारखे काम प्रत्येक कार्यकर्त्याने केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.