शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटी कार्यशाळेत आता रात्रीही दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:54 IST

ठाणे परिवहनसेवेबाबत लेखापरीक्षण अहवालात आक्षेप आल्यानंतर आता परिवहन प्रशासन खडबडून जागे झाले आहे

ठाणे : ठाणे परिवहनसेवेबाबत लेखापरीक्षण अहवालात आक्षेप आल्यानंतर आता परिवहन प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रात्रीचा दिवस करून नादुरुस्त बस रस्त्यावर जास्तीचजास्त कशा काढता येतील, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. बसदुरुस्तीसाठी आता रात्रीची शिफ्टही सुरू केली आहे. यामुळेच शनिवारी कळवा आणि वागळे आगारांतून दुप्पट बस रस्त्यावर धावल्या.ठाणे परिवहनसेवेचा २०१५-१६ चा लेखापरीक्षण अहवाल नुकताच सादर झाला. यामध्ये तब्बल ४३ आक्षेप नोंदवले आहेत. या आक्षेपांच्या अनुषंगाने सदस्यांनी परिवहनच्या बस रस्त्यावर अगदी कमी प्रमाणात धावत असल्याची जोरदार टीका केली होती. जीसीसी कॉन्ट्रक्टच्या अधिक बस धावत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. यामुळे परिवहनमधील कर्मचारीसुद्धा बसून असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे अखेर व्यवस्थापक संदीप माळवी यांनी या सर्वांची दखल घेऊन परिवहनसेवा सुधारण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. उत्पन्न आणि खर्च यामधील ताळमेळ बसवण्यासाठी प्रयत्न सुरूअसतानाच जास्तीतजास्त बस रस्त्यावर कशा उतरवता येतील, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.यापूर्वी बसदुरुस्ती केवळ सायंकाळपर्यंतच केली जात होती. त्यामुळे सायंकाळनंतर येणाऱ्या नादुरुस्त बस सकाळपर्यंत दुरुस्तीसाठी डेपोत पडून असायच्या. त्यामुळे सकाळी कार्यशाळेतील कर्मचारी आल्यानंतर दुपारपर्यंत त्या दुरुस्त होऊन रस्त्यावर उतरवल्या जात होत्या. त्यामुळे रस्त्यावर बस धावण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, आता रात्रीची शिफ्ट कळवा आणि वागळे आगारांमध्ये सुरू केल्याची माहिती व्यवस्थापक माळवी यांनी दिली.शनिवारी आल्या ९४ बस रस्त्यावरसायंकाळी येणाºया बस सकाळपर्यंत दुरुस्त होऊन रस्त्यावर धावत आहेत. यामुळे शनिवारी वागळे आगारातून ६९ आणि कळवा आगारातून २५ बस धावल्याची माहिती माळवी यांनी दिली. अजूनही इतर प्रकारचे बदल करण्याचे प्रस्तावित असून येत्या काळात यापेक्षाही अधिकच्या बस रस्त्यावर उतरवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका