शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
4
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
5
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
6
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
7
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
8
मुंबईकरांसाठी खुशखबर! एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
9
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
10
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
11
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
12
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
13
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
14
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
15
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
16
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
17
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
18
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
19
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."
20
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड

...आता ठाण्यातही मोहल्ला क्लिनिक, महानगरपालिकेचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 00:55 IST

दिल्लीत यशस्वी ठरलेली मोहल्ला क्लिनीक ही संकल्पना आता ठाण्यातही राबवली जाणार आहे.

ठाणे : दिल्लीत यशस्वी ठरलेली मोहल्ला क्लिनीक ही संकल्पना आता ठाण्यातही राबवली जाणार आहे. त्यासाठी आता महापालिकेने तयारी सुरु केली आहे. ज्या भागात महापालिकेची आरोग्य केंद्रे नाहीत, त्याठिकाणी ही मोहल्ला क्लिनीक सुरु करण्याचा पालिकेचा मानस आहे. शहरात सुमारे ५५ ते ६० क्लिनीक या धर्तीवर उभारले जाणार आहेत. यासाठी महापालिका जागा देणार असून यामध्ये खाजगी संस्थेचे डॉक्टर आणि इतर स्टाफ कार्यरत असणार आहे. येथे रुग्णाला मोफत उपचार मिळणार आहेत. अशा प्रकारचा राज्यातील हा पहिला प्रयोग आहे.दिल्लीत आप पक्षाच्या सरकारने ही संकल्पना यशस्वीरित्या राबवली आहे. त्याच धर्तीवर आता ठाण्यातही ही संकल्पना पुढे आली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या संकल्पनेतून या प्रयोगाची तयारी सुरु झाली आहे. यासाठी ठाणे महापालिकेनेसुध्दा पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. ठाणे शहरात आजच्या घडीला २५ आरोग्य केंद्रे असून कळवा रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयही कार्यरत आहे. या दोन रुग्णालयांमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून रुग्ण तपासणीसाठी येत असतात. परंतु त्यांचा वेळ खर्ची होत असतो. आरोग्य केंद्रातही अशा पध्दतीने तासन्तास रुग्ण रांगा लावून असतात. त्यामुळे त्यांच्याही वेळेचा खोळंबा होत असतो. केवळ २५ आरोग्य केंद्र असल्याने अनेकांना पायपीट करावी लागत आहे. रूग्णांची ही पायपीट आणि मनस्पात वाचविण्यासाठी ही संकल्पना पुढे आणण्याचा विचार असल्याची माहिती महापौरांनी दिली. या योजनेचा अभ्यास सुरु झाला असून शहरातील कोणत्या भागात आरोग्य केंद्र आहे, कुठे नाही, तसेच प्रभागाची लोकंसख्या याचाही अभ्यास करण्यात येत आहे. हा अभ्यास झाल्यानंतर शहरातील कोणत्या ठिकाणी मोहल्ला क्लिनीक आवश्यक आहेत, याचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर खाजगी संस्थेच्या माध्यमातून या क्लिनीकमध्ये डॉक्टर आणि इतर स्टाफ ठेवला जाणार आहे. यासाठी येणारा खर्च पालिकेला उचलावा लागणार आहे. त्यांना जागासुध्दा पालिकेला द्यावी लागणार असून त्या क्लिनीकमध्ये औषधांचा साठासुध्दा पालिका पुरविणार आहे.>गरिबांना मोफत उपचारझोपडपट्टी भागातील गोरगरीब जनतेला मोहल्ला क्लिनीकमध्ये मोफत उपचार मिळतील. दोन महिन्यात याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी पटलावर ठेवण्याचा विचार असून त्यानुसार पावले उचलण्यात येत असल्याचेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका