शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

... आता इथे टाकले जाते डेब्रिज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 03:28 IST

कल्याण : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’साठी नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करून अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन केडीएमसीकडून केले जात असताना दुसरीकडे डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या बाजूला सर्रासपणे डेब्रिज टाकले जात आहे.

कल्याण : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’साठी नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करून अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन केडीएमसीकडून केले जात असताना दुसरीकडे डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या बाजूला सर्रासपणे डेब्रिज टाकले जात आहे. ते उचलले जात नसल्याने डेब्रिजचे ढिगारे जमा झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी सुरू केलेल्या कॉल आॅन डेब्रिज या उपक्रमाचेही तीनतेरा वाजले आहेत.सध्या बहुतांश प्रभागांमधील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याचे चित्र आहे. कल्याण पूर्वेकडील सूचकनाका परिसरातील प्रभाग क्रमांक ४४, नेतिवली टेकडीमधील महात्मा फुलेनगरमध्ये महापालिकेचे पुरते दुर्लक्ष झाल्याने कचºयाचे ढीग आणि दलदलीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र मागील आठवड्यात होते. शहरातील कचरा उचलला जात नसल्याची प्रचीती महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनाही आली. मागील मंगळवारी खडकपाडा परिसरात दौरा करताना कचरा त्यांच्या निदर्शनास पडला. त्यांनी कचरा साचलेल्या ठिकाणी अधिकाºयांना बोलावून त्यांची खरडपट्टी काढलीच. त्याचबरोबर यापुढे कचरा न उचलल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.आता कचºयाबरोबर डेब्रिजचे ढिगारेही दिसू लागले आहेत. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील नंदी पॅलेस आणि अग्निशमन दलाचे कार्यालय या दरम्यानच्या एमआयडीसीच्या भूखंडावर रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकण्यात आले आहे. बरेच दिवस ते उचलले गेले नसल्याने या परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे. तेथे गॅरेजही थाटण्यात आले असून त्यांचाही वेस्ट कचरा डेब्रिजच्या ठिकाणी टाकला जात आहे. या ठिकाणी दुतर्फा ट्रक आणि टँकरसारखी मोठी वाहने उभी केली जात आहेत. या रस्त्यावर विशेष मुलांची शाळा आहे. २७ गावांना कचरा डम्पिंग ग्राउंड नसल्याने तेथे पूर्वी त्या गावांचा कचरा टाकला जात असे. त्यावर न्यायालयाने निर्बंध घालताच तेथे कचरा टाकणे बंद झाले. परंतु, आता या जागेचा वापर डेब्रिज टाकण्यासाठी होत आहे.त्याचबरोबर, एमआयडीसीत पेंढरकर महाविद्यालयाच्या गेटच्या थोडे पुढे गेल्यावरही डेब्रिज टाकले जात आहे. पश्चिमेतील रेल्वेच्या हद्दीत येणाºया बावनचाळीचा परिसर सध्या ओसाड आहे. तेथेही मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जात आहे. तेथील रस्तेही खड्ड्यांत गेल्याने ते बुजवण्यासाठी सर्रासपणे डेब्रिज आणून टाकले जात आहे. त्याकडेही केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाल्याने डेब्रिजचा पसारा वाढतच चालल्याचे पाहावयास मिळत आहे.>लोकप्रतिनिधी त्रस्तशहरातील नागरिक व विकासकांमार्फत करण्यात येणाºया बांधकाम व दुरुस्तीच्या कामांमधून मोठ्या प्रमाणात डेब्रिज निर्माण होते. बºयाच वेळा त्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने धूळ निर्माण होते. परिणामी, आरोग्याला निर्माण होणारा धोका पाहता जूनमधील पर्यावरण दिनाचे निमित्त साधत केडीएमसीने डेब्रिजमुक्त रस्ते व पदपथ अभियान सुरू केले. केडीएमसीने अभियानासाठी एजन्सी नियुक्त करून टोल फ्री नंबरही जाहीर केला. मात्र, या नंबरवर कॉल केल्यास तो केडीएमसीच्या आपत्कालीन कक्षाशी जोडला जात होता. या कॉलमुळे कर्मचारी पुरते हैराण झाले होते. विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनाही हा अनुभव आला होता. कॉल करूनही कार्यवाही न झाल्याने एका नगरसेविकेच्या पतीने येथील कर्मचाºयांना शिवीगाळ करण्याचा प्रकारही घडला होता.>‘डेब्रिजची माहिती द्या, तत्काळ उचलू’ : ‘कॉल आॅन डेब्रिज’चे नियोजन महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे होते. परंतु, हे अभियान सध्या पूर्णत: बंद पडल्याची माहिती मिळत आहे. याबाबत, डोंबिवली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी ‘कॉल आॅन डेब्रिज’ उपक्रम सुरू आहे. नागरिकांनी टोल फ्री नंबरवर डेब्रिजची माहिती दिल्यास तेथून ते तत्काळ उचलले जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :kalyanकल्याण