लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शासनाने महाराष्ट्र दिनी घोषीत केल्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक गावामध्ये अचूक संगणीकृत सातबारा (७/१२) उतारा देण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहे. या उताऱ्याच्या दृष्टीने आवश्यक ती माहिती पुरवण्यासाठी चावडी वाचन कार्यक्रम १५ मे ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खातेदार शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मूळ सातबारा, व संगणकीकृत सातबारा तपासून घेण्यासाठी शेतकऱ्यांना या चावडी वाचन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ९३ ठिकाणी हे चावडी वाचन होणार आहे.
आता संगणकीय सातबारा मिळणार
By admin | Updated: May 11, 2017 01:55 IST